प्रसिद्ध अभिनेत्रीने मालिकेतील पात्राप्रमाणेच उचललं मोठं पाऊल…

बंगळूरू : कन्नड आणि तमिळ प्रसिद्ध अभिनेत्री नंदिनी सीएम हिने बंगळूरमधील तिच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घडना घडली आहे. आई वडिलांना उद्देशून लिहिलेल्या एका चिठ्ठीत, तिच्यावर लग्नासाठी दबाव आणला जात होता आणि ती त्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार नव्हती, असं म्हटलं आहे. तसेच, इतर काही कारणांमुळे देखील ती नैराश्यात होती, असा उल्लेखही त्यात आहे. टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्रीनं अशाप्रकारे अचानक आयुष्याचा शेवट केल्याने टीव्ही इंडस्ट्री हादरली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

नंदिनीच्या अचानक झालेल्या निधनाचा कन्नड आणि तमिळ दोन्ही दूरचित्रवाणी उद्योगांतील तिचे सहकारी आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. धक्कादायक बाब म्हणजे अलीकडेच नंदिनीने काम केलेल्या ‘गोवरी’या मालिकेतील तिच्या पात्राने विष प्राशन केले, असा प्रसंग चित्रित करण्यात आला होता. अगदी त्याच पद्धतीने नंदिनीने जीवन संपवलं का? अशी चर्चा आता सोशल मीडियावर सुरू आहे. मात्र तपास अधिकाऱ्यांनी याबाबतचे वृत्त फेटाळून लावले आहे. तिच्या पडद्यावरील भूमिकेचा तिच्या मृत्यूशी कोणताही संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, नंदिनी ‘गोवरी’ मालिकेत मुख्य भूमिका साकारत होती. ज्यात ती कनक आणि दुर्गा या दोन आव्हानात्मक दुहेरी भूमिका करत होती. या मालिकेतील तिच्या अभिनयामुळे तिला प्रेक्षकांकडून ओळख आणि प्रशंसा मिळाली होती. मूळची कोत्तूरची रहिवासी असलेली नंदिनी बंगळूरमध्ये राहत होती. तिने ‘जीवा हूवागिदे’, ‘संघर्ष’, ‘मधुमगलू’ आणि ‘नीनादे ना’ यांसारख्या अनेक लोकप्रिय कन्नड मालिकांमध्ये काम केले होते. नंदिनी सीएमच्या मृत्यूमुळे दूरचित्रवाणी क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

पुणे! नवले पूल अपघतात अभिनेत्याचा मृत्यू! चिमुकला झाला पोरका…

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचे निधन…

प्रसिद्ध अभिनेता हॉटेल रुममध्ये आढळला मृतावस्थेत…

अभिनेत्रीच्या एकुलत्या एका मुलाने 57व्या मजल्यावरून मारली उडी…

प्रसिद्ध अभिनेत्रीची घरात गळफास घेऊन आत्महत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!