घाटंजी न्यायालयासह यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने यवतमाळ येथील जिल्हा न्यायालय, यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील न्यायालयात 27 जुलै 2024 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून राष्ट्रीय लोक अदालत सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे.

घाटंजी येथील न्यायालयात सकाळी कोर्ट क्रमांक 1 दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. उत्पात यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या वेळी कोर्ट क्रमांक 2 दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. कळमकर उपस्थित राहणार आहे. या प्रसंगी घाटंजी तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अनंतकुमार पांडे, सचिव ॲड. सादीक खान यांच्या सह घाटंजी न्यायालयातील अनेक अधिवक्ता उपस्थित राहणार आहे.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

27 जुलै 2024 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीत न्यायालयातील प्रलंबित प्रकरणा बरोबरच वाद पुर्ण प्रकरणांमध्ये म्हणजे, विद्युत कंपनी, विविध बॅका, पतसंस्था यांचे थकीत बाकी येण्याबाबतचे दाखल पुर्ण प्रकरणे, घाटंजी व पारवा पोलिस ठाण्यातील अदखलपात्र गुन्हे, वाहतूक विभाग यांनी वाहनांवर केलेली दंडात्मक कारवाई, त्याच्या वसुलीची प्रकरणे ठेवण्यात आली आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीतील प्रकरणांमध्ये लोकन्यायालयात निवाडा झाल्यास न्यायालयात खटला दाखल करण्याची आवश्यकता पडणार नाही. त्याचा लाभ घेऊन परस्परातील वादांना आपसी समझोता करुन पुर्ण विराम देता येणार आहे. सामंजस्य आणि तडजोडीने जिवन सुखी बनवता येईल. त्यासाठीच लोक न्यायालयाचा मार्ग निवडण्याचे आवाहन, दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. उत्पात यांनी लोक अदालतीतीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तथापि, शनिवार 27 जुलै 2024 रोजी संपुर्ण महाराष्ट्रात उच्च न्यायालय व त्यांची सर्व खंडपिठ, जिल्हा न्यायालय, सर्व न्यायाधिकरण आणि तालुका न्यायालयाच्या ठिकाणी एकाच वेळी राष्ट्रीय लोक अदालत होणार आहे.

दरम्यान, नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात 29 जुलै ते 3 ऑगस्ट 2024 दरम्यान विशेष लोक अदालतीचे प्रथमच लोक अदालत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. घाटंजी येथील राष्ट्रीय लोक अदालतीत घाटंजी पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक (PI) निलेश सुरडकर, पारवा पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) संदीप नरसाळे या सह पोलिस विभागाचे कोर्ट मोहरर, जमादार, पोलिस शिपाई आदीं न्यायालयातील प्रकरणात सहकार्य करण्यासाठी उपस्थित राहणार आहे.

पोलिसकाका Video News: २६ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप…

नाशिकमध्ये तुरुंगातून सुटलेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक अन् घोषणा…

भारतातील युवतीचे पाकिस्तानी युवकासोबत ऑनलाइन लग्न; पुन्हा भारतात परतली अन्…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!