भाडे आकारणीवरून रिक्षाचालकाकडून आरटीओ अधिकाऱ्यावर हल्ला; साथीदारांच्या मदतीने केली बेदम मारहाण…

नवी मुंबई: मीटरप्रमाणे भाडे आकारण्याच्या वादातून नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) सहायक मोटार वाहन निरीक्षक तुषार कदम, यांच्यावर रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदारांनी हल्ला केल्याची गंभीर घटना नेरूळमधील एल. पी. जंक्शन परिसरात घडली आहे. या प्रकरणी नेरूळ पोलिसांनी रिक्षाचालकासह पाच जणांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नवी मुंबई उपप्रादेशिक […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील 11 पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल; पाहा नावे…

पुणे : आंबेगाव पठार पोलिस चौकीत आठ अल्पवयीन मुलांना बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवून बेदम मारहाण केल्याप्रकरणी अखेर गुन्हा (FIR) दाखल झाला आहे. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या फॅक्ट फाईंडिंग रिपोर्टनंतर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात 11 पोलिस अधिकारी आणि अंमलदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात अल्पवयीन मुलांना मारहाण प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात 11 पोलिसांवर FIR […]

अधिक वाचा...

रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांचा स्वीय सचिव लाचखोरीच्या जाळ्यात…

अलिबाग: तक्रारदाराच्या पत्नीची बदली करून देण्यासाठी एक लाख ५० हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांचे स्वीय सहाय्यक योगेश प्रकाश भस्मे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) रायगड पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई २३ सप्टेंबर रोजी करण्यात आल्याचे वृत्त आहे. भस्मे हे जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात वित्त लेखा सहाय्यक म्हणून […]

अधिक वाचा...

तुम्हाला मरायचे असेल तर मरा, बस थांबणार नाही; बस चालकाच्या अरेरावीनंतर बसमधील ९ प्रवाशांचा होरपळून मृत्यू…

नोएडा: उत्तर प्रदेशातील यमुना द्रुतगती मार्गावर बसला आग लागल्याच्या घटनेत प्रवाशांनी चालक आणि वाहकावर घोर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. प्रवासी सुनील कुमार यांच्या तक्रारीनुसार, काही प्रवाशांनी बसच्या चालकाच्या केबिनमधून काहीतरी जळत असल्याचा वास येत असल्याची तक्रार चालक आणि वाहकाला दिली होती. आगीत अनेक प्रवासी गंभीररित्या भाजले. त्यांना उपचारासाठी जेवर येथील कैलास रुग्णालयात नेण्यात आले. सुनीलच्या […]

अधिक वाचा...

पुणे! विद्यानंद बापट यांचा इम्पॅक्ट, 14 डीजे चालकांवर गुन्हे दाखल…

पुणे : गणेशोत्सवात विद्यानंद बापट यांचा इम्पॅक्ट पाहायला मिळत असून डीजे बंदीच्या मुद्द्यावरुन लोक आक्रमक झाल्यानंतर आता पोलिसांकडूनही कारवाई केली आहे. सोलापूर, नागपूर, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात ध्वनीप्रदुषणाला टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत डीजे वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पुण्यातही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी लेझर लाईट आणि डीजेचा वापर करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा […]

अधिक वाचा...

सण उत्सवासह मिरवणुकीत सार्वजनिक स्थळी फटाके वाजवण्यास बंदी; अन्यथा…

मुंबई : धार्मिक सण-उत्सव आणि मिरवणुकांदरम्यान होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने गणेश मंडळांना मोठा झटका दिला आहे. ढोल-ताशा पथकांमध्ये हातोड्याने बडवल्या जाणाऱ्या धातूच्या सिलेंडरवर (टोल वाद्य), सार्वजनिक ठिकाणी वाजवल्या जाणाऱ्या फटाक्यांवर आणि धोकादायक लेझर लाईट्सवर उच्च न्यायालयाने पूर्णपणे बंदी घातली आहे. नियम मोडणाऱ्यांची ध्वनी उपकरणे जप्त करण्याचे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत. उच्च न्यायालयाने काल […]

अधिक वाचा...

साहिल वाकोडेच्या आत्महत्येनंतर आयआयटी मुंबईच्या प्रा. सूर्यनारायण दुला यांचा राजीनामा

मुंबई: द्वितीय वर्षाचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येनंतर आयआयटी मुंबईमध्ये खळबळ उडाली आहे. प्राध्यापक सूर्यनारायण दुला यांच्या विरोधात अनुसूचित जाती आणि जमाती कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे व्यथित झालेल्या प्राध्यापकांनी आयआयटी मुंबईतून राजीनामा दिला असून, ते एका मोठ्या वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. या वादामध्ये विद्यार्थ्यांची आंदोलने, वाकोडेच्या पालकांचे आरोप आणि परीक्षेसंबंधित ही […]

अधिक वाचा...

टीईटी पेपरफुटी प्रकरणी दोन फरार आरोपींना पोलिसांकडून अटक…

भिवंडीः टीईटी पेपरफुटी प्रकरणात फरार असलेल्या दोन आरोपींना अटक करण्यात पोलीस यंत्रणेला यश आले आहे. या आरोपींना रविवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना २३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपींच्या अटकेनंतर टीईटी प्रकरणात आतापर्यंत अटक केलेल्या एकूण आरोपींची संख्या १८ वर पोहोचली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे. […]

अधिक वाचा...

दिल्लीतील सरिता विहारमध्ये भरधाव डंपरच्या भीषण अपघातात एचआर मॅनेजर आणि इतर तिघांचा मृत्यू…

नवी दिल्ली: दिल्लीतील सरिता विहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत, भरधाव वेगाने येणाऱ्या एका डंपरने उभ्या असलेल्या क्रेन आणि एका रिक्षाला धडक दिली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आणि इतर तीन जण जखमी झाले. या अपघातामुळे घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचाव व मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी […]

अधिक वाचा...

केतन अग्रवाल हत्या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी वडगाव मावळ न्यायालयात दोषारोपपत्र सादर…

पुणे: केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण करून पुणे ग्रामीण पोलिसांनी वडगाव मावळ न्यायालयात ५०५३ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. सिया प्रवीण गोयल, चेतन बाबुलाल चौधरी आणि रितेश संजय हंगे यांच्याविरोधात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी प्रत्यक्ष साक्षीदारांसह डिजिटल आणि तांत्रिक पुरावेही मोठ्या प्रमाणावर संकलित केले आहेत. दोषारोपपत्रात संशयितांच्या मोबाईल फोनमधील […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!