निलेश घायवळसह बंधुंचा आणखी एक कारनामा समोर…

पुणे : पुणे शहरातील कोथरूड परिसरातील नव्याने बांधलेल्या इमारतीतील तब्बल दहा सदनिका जबरदस्तीने ताब्यात घेतल्याप्रकरणी कुख्यात गुंड निलेश घायवळ, त्याचा भाऊ आणि पिस्तूल परवान्यावरून चर्चेत आलेला सचिन घायवळ तसेच आणखी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश घायवळवर दाखल झालेला हा पाचवा गुन्हा आहे.

निलेश घायवळ सध्या लंडन येथे आढळल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिसांनी पुणे आणि जामखेड येथील त्याच्या राहत्या घरांवर छापे टाकले असून, त्याचे नातेवाईक आणि सहकारी यांचा शोध घेतला जात आहे. मात्र, सर्वजण सध्या फरारी आहेत. या प्रकरणात एका व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीवरून कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदनिकांवर जबरदस्तीने कब्जा घेण्याचा हा प्रकार २०२२ ते २०२३ दरम्यान घडल्याचे तपासातून समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला असून, याबाबत पुण्याचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी माहिती दिली आहे. व्यावसायिकाच्या डोक्यावर पिस्तूल लावून खंडणी मागितली त्याप्रकरणी घायवळ बंधूंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही सर्व घटना २०१८ पासून आत्तापर्यंत सुरू असल्याची तक्रार फिर्यादी यांनी त्यांच्या फिर्यादीत म्हटली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांकडून कोथरूड भागात एका इमारतीचे काम सुरू होते. तेव्हा आरोपींनी त्यांना तेथे जाऊन धमकावले. ‘निलेश घायवळच्या परवानगीशिवाय येथे काहीही होऊ शकत नाही,’ अशी धमकी देऊन तक्रारदारांचे बांधकाम अडवले. नंतर सदनिकांची मागणी केली. तक्रारदारांनी तेव्हा तक्रार दिली नाही. पण, बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आरोपींनी याच इमारतीमधील दहा सदनिकांचा जबरदस्तीने खंडणी स्वरूपात ताबा घेतला. या सदनिका भाड्याने इतर व्यक्तींना दिल्या. या सदनिकांचे भाडे घेऊन ते निलेश घायवळला देत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईनंतर निलेश घायवळविरोधात तक्रार करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर ही तक्रार पुणे पोलिसांकडे प्राप्त झाली आहे. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास करत आहेत.

गुंड निलेश घायवळ याच्या घरावर पोलिसांची धाड; काय-काय सापडलं पाहा…

गॅंगस्टर निलेश घायवळ याचा आणखी एक कारनामा समोर…

गँगस्टर निलेश घायवळ पळाला स्विझर्लँडला, पुणे पोलिसांनी आवळल्या नाड्या….

कुख्यात गुंड निलेश घायवळ याचे लोकेशन सापडलं! लंडनमध्ये नव्हे तर…

गुंड निलेश घायवळ याला पासपोर्ट कुठून मिळाला याची माहिती आली समोर…

पुणे पोलिसांनी आरोपींची काढली धिंड; निलेश घायवळ लंडनला…

पुण्यात घायवळ गँगचे मध्यरात्री 2 कांड; पाहा काय-काय केलं…

पुणे! घायवळ टोळीकडून शुल्लक कारणावरून भररस्त्यात एकावर गोळीबार…

पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या श्रीमुखात लगावली पैलवानाने…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!