पिंपरी-चिंचवडमधील युवतीची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक अन् पोलिसांकडून…
पुणे (संतोष धायबर): पिंपरी-चिंचवडमध्ये परिसरात वास्तव्यास असणाऱ्या युवतीची १३ लाख रुपयांची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक झाली आहे. युवतीने सायबर क्राईम विभागामध्ये तक्रार दाखल केली. पण, संबंधित अधिकाऱ्यांकडे, कर्मचाऱ्यांकडे तपासाबाबत चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून असमाधानकारक उत्तरे मिळत आहे, असे युवतीने सांगितले. युवतीच्या मोबाईलवर १० सप्टेंबर रोजी एक फोन आला होता. संबंधित व्यक्तीने ड्रग्ज रॅकेटमध्ये तुमचे नाव असल्याचे सांगून […]
अधिक वाचा...माजी आमदारास महिला अत्याचार प्रकरणात दोन दिवसांची पोलिस कोठडी…
अहमदनगर: श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना महिला अत्याचार प्रकरणी राहुरी पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी भानुदास मुरकुटे यांच्या विरोधात राहुरी पोलिस ठाण्यात काल गुन्हा दाखल झाला आहे. आमदार मुरकुटे यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. राहुरी तालुक्यातील एका महिलेने अत्याचार प्रकरणी […]
अधिक वाचा...प्रेमाचा त्रिकोण! प्रियकरासाठी सपासप वार करून एकीने दुसरीला संपवलं…
अमरावती : प्रेम प्रकरणामधून एका युवतीने दुसऱ्या युवतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना राजापेठ ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. शुभांगी काळे (वय २६, रा. आर्वी, जि. वर्धा) असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. अमरावतीमध्ये सोसायटीच्या मागे शुभांगीवर सपासप चाकूने वार करण्यात आले, यानंतर शुभांगीने आरडाओरडा केला, त्यामुळे हल्ला करणारी दुसरी युवती तिथून […]
अधिक वाचा...बोपदेव घाट प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार; शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी केली घटनेची पाहणी…
पुणे: पुणे शहराजवळ असलेल्या बोपदेव घाट परिसरात एका युवतीवर (वय २१) सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेतील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथकं काम करत आहेत, दोन आरोपीचे स्केच देखील पोलिसांनी शेअर केले आहेत, तर आरोपींबाबत काही माहिती असेल तर ती कळवल्यास त्यांना इनाम देण्यात येईल, अशी घोषणा देखील पोलिसांनी केली आहे, […]
अधिक वाचा...ओंकारेश्वर मंदिराची उघडलेली दानपेटी चोरट्यांनी फोडली; सुमारे 6,000 रुपये चोरले
पुणे : ही चोरी रविवारी सकाळी उघडकीस आल्याने पोलिसांनी तत्परतेने तपास सुरू केला. मध्यरात्री झालेल्या घरफोडीच्या घटनेत चोरट्यांनी शनिवार पेठेतील ऐतिहासिक ओंकारेश्वर मंदिरात प्रवेश करून दानपेटीतील अंदाजे 6,000 रुपये चोरून नेले. चोरीचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला, त्यामुळे पोलिसांनी वेगाने तपास केला. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घुसखोरांनी मंदिरात प्रवेश केला आणि पैसे घेऊन पळून जाण्यापूर्वी जबरदस्तीने […]
अधिक वाचा...विद्यार्थ्यांना लुटणाऱ्या दोघांना चतुःश्रृंगी पोलिसांनी केली शिताफीतीने अटक…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील सुस-पाषाण टेकडीवर नागालँन्ड राज्यातील स्पायसर कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे विदयार्थी यांना जबरदस्तीने लुटणाऱ्या आरोपींना चतुःश्रृंगी पोलिसांनी शिताफीतीने अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये २८/०९/२०२४ रोजी १९/३० वाजे चे सुमारास सुस-पाषाण टेकडी पुणे येथे स्पायसर कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे नागालँड राज्यातील फिर्यादी पौंर्जेदाई कामेई (वय १९, धंदा […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यात गरबा किंगने दांडिया खेळताना मुलासमोरच सोडला जीव…
पुणे : पुणे जिल्ह्यातील चाकण येथे गरबा खेळत असताना गरबा किंग म्हणून प्रसिद्ध असलेले कलाकार अशोक माळी हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. मुलासोबत गरबा खेळताना अचानक भोवळ आली आणि ते खाली कोसळले. उपस्थितांनी त्यांना तात्काळ उचलून रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अशोक माळी यांचा मृत्यू कॅमेऱ्यात […]
अधिक वाचा...धक्कादायक! अहमदनगर जिल्ह्यात दिराने केली दोन वहिनींची हत्या…
अहमदनगर : एका दिराने आपल्या दोन वहिणींची कोयत्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपी हातात कोयता घेऊन गावात फिरताना सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील बेलापूर गावात ही घटना घडली आहे. पैशांच्या किरकोळ वादातून दिरानेच आपल्या दोन भावजयांची कोयत्याने वार करून हत्या […]
अधिक वाचा...५.९६ कोटी रुपयांच्या शेअर बाजारात फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक
पुणे : 43 गुंतवणूकदार खोट्या प्रशिक्षणासाठी पडले, घोटाळेबाजांनी दिले उच्च परतावा देण्याचे आश्वासन आजकाल, लोक म्हणतात की शेअर बाजारात भरपूर पैसे कमावता येतात. अशा प्रकारे श्रीमंत होण्याच्या आशेने सिटी-झेन्सना त्यांच्या कष्टाचे पैसे त्यात घालण्याचा मोह होतो. या प्रवृत्तीचा फायदा घेऊन, गुन्हेगार भोळ्यांना फसवायला निघाले आहेत. गुन्हेगार वापरत असलेला एक मार्ग म्हणजे शेअर मार्केटवर ट्रेडिंगचे प्रशिक्षण […]
अधिक वाचा...धक्कादायक! प्रियकराच्या हत्येनंतर प्रेयसीने आरोपीसोबत बसून ओढले सिगारेटचे झुरके…
ठाणे : ठाण्यात प्रेमप्रकरणातून युवकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. ४) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. स्वयम शैलेश परांजपे (वय ३३) असे हत्या झालेल्या युकाचे नाव आहे. या गुन्ह्यात आरोपीला प्रेयसीनेच मदत केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी प्रेयसीसह तिच्या नव्या प्रियकराला अटक केली आहे. मयुरेश नंदू धुमाळ असे आरोपी प्रियकराचं नाव […]
अधिक वाचा...
