कोपर्डी घटनेतील आरोपीच्या चुलत भावाची आत्महत्या; तमाशात नाचल्याने…

अहमदनगर : कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या चुलत भावाने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. मागासवर्गीय तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करून, नग्न करत मारहाण करण्यात आल्यामुळे व्यथित झालेल्या तरुणाने आत्महत्या केल्याचा नातेवाईकांनी आरोप केला. या प्रकरणी तिघांविरोधात गु्हा दाखल झाला आहे. विठ्ठल कांतीलाल शिंदे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्या वडिलांनी कर्जत पोलिसात तक्रार दाखल केली आहे […]

अधिक वाचा...

अहमदनगर जिल्हा हादरला! मांजरीमुळे एकाच कुटुंबातील सहा जण बुडाले…

अहमदनगर : मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये सहा जण बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये बुडाल्याची धक्कादायक घटना नेवासा तालुक्यातील वाकडीमध्ये आज (मंगळवार) घडली आहे. बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये बुडालेल्या एकाला वाचवण्यात यश आले आहे. इतरांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह सुरू असताना एकसारख्याच दोन घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. पहिली […]

अधिक वाचा...

अहमदनगर हादरलं! दारुड्याने संशयावरून पेटवले घर, तिघींचा होरपळून मृत्यू…

अहमदनगर: पिंपळगाव लांडगा येथे पत्नी आणि दोन मुलींना जाळून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून दारुच्या नशेत पतीने हे कृत्य केले आहे. या कृत्यामुळे नगरसह परिसरामध्ये खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. सुनील लांडगे असे आरोपी पतीचे नाव आहे. सुनील याने पत्नी लीला आणि दोन मुलींना घरात कोंडले. त्यानंतर बाहेरून कुलूप लावून […]

अधिक वाचा...

अहमदनगरच्या व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला; गावठी कट्टा सापडला…

अहमदनगर: अहमदनगर शहरातील बन्सी महाराज मिठाईवाले दुकानाचे मालक धीरज मदनलाल जोशी (वय 53) यांच्यावर गुलमोहर रोडवरील किर्लोस्कर कॉलनीत प्राणघातक हल्ला झाला असून, ते गंभीर जखमी झाले आहेत. अज्ञात हल्लेखोरांनी तलवार यासारख्या हत्याराने त्यांच्यावर हल्ला केला आहे. तसेच, घटनास्थळी एक गावठी कट्टा देखील मिळून आला आहे. व्यापाऱ्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न करत असतांना झटापटीत पिस्तुल खाली पडली. […]

अधिक वाचा...

अहमदनगर-कल्याण भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू…

अहमदनगर : अहमदनगर-कल्याण महामार्गावर एसटी बस आणि ट्रॅक्टरमध्ये झालेल्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. ढवळापूर फाट्याजवळ असलेल्या एसटी बस, इको गाडी आणि उसाच्या ट्रॅक्टरमध्ये मंगळवारी (ता. २३) मध्यरात्री अडीचच्या सुमारास हा अपघात झाला आहे. ठाणे-मेहकर एसटी बस, उसाचा ट्रॅक्टर आणि इको मोटारीमध्ये अपघात झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की, सहा जणांचा मृत्यू […]

अधिक वाचा...

अहमदनगरमध्ये दर्शनासाठी जाताना भीषण अपघात; 3 ठार 8 जखमी…

अहमदनगर: अहमदनगर-दौंड महामार्गावर ट्रक आणि झायलो कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात ३ जण जागीच ठार झाले असून ८ जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. अहमदनगर दौंड महामार्गावर आज (रविवार) सकाळी ११ वाजता ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. कारमधील सर्वजण हे श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील दर्गाच्या दर्शनासाठी […]

अधिक वाचा...

अहमदनगर जिल्ह्यात वस्तीगृहात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार…

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील एका वस्तीगृहात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर दोन युवकांनी चाकूचा धाक दाखवून आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केला आहे. या प्रकरणात पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन अल्पवयीन मुली जिल्ह्यातील एका महाविद्यालयातील वस्तीगृहात शिक्षणासाठी राहत आहेत. पीडित मुलींवर दोन युवकांनी […]

अधिक वाचा...

पोलिसकाकाच्या पत्राने पोलिस दलात उडाली खळबळ…

अहमदनगर : पदोन्नतीमध्ये भ्रष्टाचार असल्याचा आरोप करत दोन दिवसात पदोन्नतीची यादी न बदलल्यास आत्महत्या करेन, असे पत्र पोलिसकाकाने लिहिले असून, या पत्रामुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये रामनाथ भाबड हे हेड कॉन्स्टेबलपदी कार्यरत आहेत. दोन दिवसांत प्रमोशन न मिळाल्यास आत्महत्या करणार असल्याचे निवेदन पोलिस अधिक्षकांना दिले आहे. शिवाय, पोलिस महासंचालक, विशेष […]

अधिक वाचा...

अहमदनगर जिल्ह्यात जमावाच्या हल्ल्यात मृत्यू; चार महिलांची हत्या अन् छेड…

अहमदनगर: चार महिलांच्या हत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्त झालेल्या व्यक्तीची जमावाकडून हत्या करण्यात आल्याची घटना सुगाव (ता. अकोला) येथे घडली आहे. अण्णा वैद्य असे जमावाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. सुगावमध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढण्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या जमावाने अण्णा वैद्य याच्या घरावर हल्ला केला. छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्याचे काम […]

अधिक वाचा...

अहमदनगर हादरले! महिला आणि चिमुकल्याच्या अंगावर कार घालून हत्या…

अहमदनगर: घराच्या जागेवरुन सुरु असलेला वादातून आरोपीने महिला आणि तिच्या अडीच वर्षांच्या मुलाच्या अंगावर कार घालून दोघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. २३) सायंकाळी पारनेरमध्ये घडली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मृत महिलेची सासू चंद्रकला येनारे यांनी फिर्याद केली आहे. पोलिसांनी किरण श्रीमंदिलकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध सुरू केला […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!