धक्कादायक! प्रियकराच्या हत्येनंतर प्रेयसीने आरोपीसोबत बसून ओढले सिगारेटचे झुरके…

ठाणे : ठाण्यात प्रेमप्रकरणातून युवकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. ४) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. स्वयम शैलेश परांजपे (वय ३३) असे हत्या झालेल्या युकाचे नाव आहे. या गुन्ह्यात आरोपीला प्रेयसीनेच मदत केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी प्रेयसीसह तिच्या नव्या प्रियकराला अटक केली आहे. मयुरेश नंदू धुमाळ असे आरोपी प्रियकराचं नाव आहे.

स्वयम हा त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला ब्लॅकमेल करत होता. तिचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेन अशी धमकी देत होता. यामुळे त्रासलेल्या त्याच्या प्रेयसीने तिच्या प्रियकरासह मिळून स्वयमचे घर गाठले. दोघांनी त्याच्यावर कोयत्यानं आणि कटरने जवळपास ५० वार केले. स्वयमवर वार केल्यानंतर तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. हत्येनंतर प्रेयसी आणि तिचा प्रियकर इमारतीच्या खाली आले. तिथे ते १० मिनिटं शांतपणे बसले होते. तिथे त्यांनी सिगारटचे झुरके घेत पोलिस येण्याची वाट पाहिली.

पोलिस घटनास्थळी आल्यानंतर दोन्ही आरोपी स्वत: पोलिसांसमोर शरण गेले. ते पोलिसांच्या गाडीत बसले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेला.

दरम्यान, स्वयम हा ब्लॅकमेल करत असल्याचे युवतीने तिचा नवा प्रियकर मयुरेश धुमाळ याला सांगितले. यानंतर स्वयमला संपवायचे असे ठरवूनच दोघेही त्याचा शोध घेत होते. गुरुवारी रात्री त्यांनी स्वयमला शोधण्याचा प्रयत्न केला. पण तो सापडला नव्हता. शेवटी शुक्रवारी सकाळी मयुरेश स्वयमच्या घरी गेला आणि तिथेच त्याची हत्या केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

बीड! प्रेमसंबंधातून युवकाची आत्महत्या; हॉटेलमध्ये कपल गेल्याचे पाहिले अन्…

पुणे हादरलं! प्रेयसीची हत्या करून मृतदेह रिक्षासह आईच्या दारात सोडून प्रियकर फरार…

अनैतिक संबंध! प्रियकराने केली प्रेयसीची दगडाने ठेचून हत्या…

प्रेमसंबंधातूनच अंजलीची हत्या; प्रियकराने तपासादरम्यान सांगितले…

धक्कादायक! पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून वर्गातील मुलाने केली महिलेची हत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!