मुंबईत एअर होस्टेस गळा चिरून हत्या; एकाला अटक…

मुंबई : पवई परिसरात रूपल ओगरे (वय 23) या एअर होस्टेसची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पवई पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, इमारतीत साफसफाईचे काम करणाऱ्याला ताब्यात घेतले आहे.

मरोळ मारहाव रोडवर असलेल्या एन जी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये रूपल ओगरे ही एअर होस्टेस राहत होती. राहत्या घरी मध्यरात्री तिचा मृतदेह सापडला. गळा चिरुन तिची हत्या करण्यात आली होती. याची माहिती मिळताच पवई पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवला आहे. त्यानंतर आरोपीच्या शोधासाठी चार पथके तयार करण्यात आली.

पोलिसांच्या तपासादरम्यान एअर होस्टेसच्या हत्या प्रकरणात इमारतीमध्ये साफसफाईचे काम करणाऱ्या एकाला पवई पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस त्याची चौकशी करत आहेत. रूपल ओगरे ही बहिण आणि मित्रासोबत राहत होती. परंतु, ते दोघे गावाला गेले होते. रुपल ओगरे घरात एकटीच असताना तिची हत्या करण्यात आली.

मुंबई पोलिसांचे डीसीपी दत्ता नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पवई पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मारवाह रोडवर असलेल्या एनजी हाऊसिंग सोसायटीमध्ये युवतीचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस पथकाने मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना पकडण्यासाठी ४ पथके पाठवण्यात आली होती. पुढील तपास करत आहोत.’

धक्कादायक! प्रेमसंबंधातून नवऱ्यासह तीन मुलांची हत्या…

‘प्रेम करताना जात धर्म बघू नका,’ असे स्टेटस ठेवत प्रेमीयुगलाची आत्महत्या…

सना खान यांच्या हत्या प्रकरणात हाय व्होल्टेज ड्रामा…

एकतर्फी प्रेमातून आत्महत्या; विसरु शकत नाही, तिने केवळ वापर केला…

प्रेमसंबंधातूनच अंजलीची हत्या; प्रियकराने तपासादरम्यान सांगितले…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!