
प्रेमप्रकरणातून मुलीने तोडले आईचे बोट अन् आईने केली मुलीची हत्या…
मुंबई : प्रेमप्रकरणावरून मुलगी आणि आई यांच्यात झालेल्या वादात मुलीने आईचे बोट तोडले होते तर आईने १९ वर्षांच्या मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना वाद्रे पूर्व येथील खेरवाडी परिसरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी टीना उमेश बागडे हिला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
टीना उमेश बागडे ही मुलगी भूमिका आणि दोन मुलांसोबत राहत होती. खेरवाडीच्या गणपत चाळीत त्यांचे घर आहे. टीनाच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. टीनाची मुलगी ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकत होती. तिचे एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. त्यावरून टीना आणि भूमिका यांच्यात वाद झाला होता. दोघींमध्ये सोमवारी वाद झाला आणि यावेळी हाणामारीही झाली. यावेळी भूमिका हिने आईच्या बोटाचा चावा घेतला. यावेळी बोटाचा तुकडा पडला. तेव्हा आई टीना हिने मुलगी भूमिकाचा गळा दाबून खून केला. भूमिकाच्या शवविच्छेदन अहवालात तिचा गळा दाबला गेल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी टीना बागडे हिच्यावर गुन्हा दाखल केला असून तिच्यावर अटकेची कारवाई केली आहे.
दरम्यान, टीनाने मुलीचा खून केल्यानंतर तिला फिट आल्याचे भावाला सांगितले होते. त्यानंतर भूमिकाला व्हीएन देसाई रुग्णालयात दाखल केले पण तिला मृत घोषित करण्यात आले. डॉक्टरांनी याबाबत पोलिसांना कळवले. पोलिसांनी पंचनामा केला तेव्हा तिच्या मानेवर जखमा आढळून आल्या. त्यामुळे आई सांगत असलेल्या घटनाक्रमावर संशय निर्माण झाला. भूमिकाच्या लहान भावंडासमोरच आईने तिला मारले. पण आईने लहान मुलांना हे कोणालाही सांगू नका अशी धमकी दिली. भूमिकाला आधीपासून फिट यायची, त्यावर उपचारही घेतले होते. त्याचाच आधार घेत आई टीनाने तिला फिट आल्याचे सांगत बनाव रचण्याचा प्रयत्न केला होता. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिस अधिकाऱ्यासोबत महिला डॉक्टरचे प्रेमसंबंध अन् आत्महत्या…
महिला पोलिसाच्या मुलाने प्रेमप्रकरणातून घेतला जगाचा निरोप…
मामीसोबत होते भाच्याचे प्रेमसंबंध अन् पुढे…
पुण्यातील व्यावसायिकाची प्रेम प्रकरणातून गुवाहाटीत हत्या…
हृदयद्रावक! वहिनीचे दिरासोबत प्रेमसंबंध; तीन चिमुकले अन् पोलिस…

