
भाजपच्या वर्षा पवार यांचा मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ…
नवी दिल्लीः दिल्लीत भाजपच्या महिला कार्यकर्ता वर्षा पवार (वय 28) यांचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. वर्षा पवार या 24 फेब्रुवारीपासून बेपत्ता होत्या. दिल्लीमधीलच एका प्लेस्कूलमध्ये मृतदेह सापडला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा पवार यांचे नरेला येथील स्वतंत्र नगर भागात वास्तव्य होते. वडील विजय कुमार यांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘वर्षा 23 फेब्रुवारीला स्कुटी घेऊन घराबाहेर पडली होती. अखेरची ती आपला व्यावसायिक भागीदार सोहन लालसोबत दिसली होती. वर्षाने सोहनसोबत घोंडा रोड येथे टायनी ड्रीम बेरी प्लेस्कूल सुरू केले होते. हे प्लेस्कूल अजून सुरु झालेले नाही. त्यांनी 24 फेब्रुवारीला वर्षाला फोन केला होता. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने हा फोन कॉल घेतला होता. आपले नाव हर्षना असून हा फोन रेल्वे ट्रॅकवर सापडल्याचा दावा त्या व्यक्तीने केला होता. तसेच एक व्यक्ती ट्रॅकवर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्याने सांगितले होते. त्या व्यक्तीने व्हिडीओ कॉलही केला होता. त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीची ओळख सोहन म्हणून केली होती. पण जेव्हा विजय कुमार हर्षनाकडे पोहोचला तेव्हा त्याला सोहन सापडला नाही.’
पोलिसांनी प्लेस्कूलमध्ये शोध घेतला असता त्यांना काहीच सापडला नाही. पण तळमजला बंद असल्याने ते आतमध्ये जाऊ शकत नव्हते. यानंतर पोलिसांनी मोबाईल फोन ट्रॅक करत सोहनचे शेवटचं लोकेशन जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना सोहन किंवा वर्षा कोणीही सापडले नाही. विजय कुमार यांनी बुधवारी प्लेस्कूल गाठले आणि मालकाला शाळेचे शटर उघडण्याची विनंती केली. यानंतर त्यांनी मेन डेस्कच्या मागे वर्षाचा मृतदेह आढळला. त्यांना तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता तिचा दुपट्टा गळ्याभोवती गुंडाळलेला होता. यामुळे प्राथमिकदृष्ट्या पोलिसांना ही हत्या असल्याचा संशय आहे. वर्षाची हत्या केल्यानंतर सोहनने आत्महत्या केली असा संशय आहे. याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
भाजप नेत्याची घरात घुसून हत्या; पत्नीने केला संशय व्यक्त…
विवस्त्र महिला धावतानाचा व्हिडिओ व्हायरल; भाजप आमदार पत्नीविरोधात गुन्हा दाखल…
भाजप नेत्या सना खान हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक…
नागपूरमध्ये माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

