गौतमी पाटील हिच्यावर गुन्हा दाखल…

अहमदनगर: नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यावर अहमदनगर मधील तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्त्यावर मंडप टाकून रहदारीस अडथळा होईल अशा प्रकारे कार्यक्रम घेतल्याबद्दल नगरमधील गणपती मंडळाच्या अध्यक्षांसह गौतमी पाटील आणि तिच्या मॅनेजर विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर शहरातील पाईपलाईन रोडवर गुरूवारी (ता. २८) सायंकाळी मृत्युंजय प्रतिष्ठान आणि एकदंत मित्र मंडळ […]

अधिक वाचा...

पुणे शहरात गणेशोत्सवादरम्यान पोलिसकाकांना भोजन व अल्पोपहार!

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात गणेशोत्सवादरम्यान बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना भोजन व अल्पोपहाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यावेळी अनेकांनी कर्तेव्य बजावताना भोजनाचा आस्वाद घेतला, अशी माहिती दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी दिली. प्रशांत शिंदे म्हणाले, ‘गणेशोत्सव विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी साधारणपणे सलग ४८ तास पोलिस अंमलदार व अधिकारी यांना […]

अधिक वाचा...

पाकिस्तान हादरला! पोलिस अधिकाऱ्यासह ५२ ठार; शेकडो जखमी…

कराची (पाकिस्तान): बलुचिस्तान प्रांतामध्ये आज (शुक्रवार) आत्मघाती हल्ल्यात पोलिस अधिकाऱ्यासह 52 जणांचा मृत्यू झाला आहे तर शेकडो जण जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. ईदचा सण साजरा करण्यासाठी जमलेल्या नागरिकांवर एका सुसाईड बॉंबरने हल्ला केल्याची माहिती पुढे आली आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘बलुचिस्तानच्या मस्तुंगमधील अल […]

अधिक वाचा...

२० लाखांचे ५ कोटी करतो म्हणून लाईट बंद करुन धुर केला अन्…

पुणे : एका महिलेला २० लाख रुपयांचे ५ कोटी रुपये करुन देण्याचे आमिष दाखवून तब्बल २० लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. याबाबत नारायण पेठेत राहणार्‍या महिलेने (वय ४२) विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार तनवीर शामकांत पाटील, शिवम गुरुजी, सुनिल राठोड आणि आनंदस्वामी यांच्यावर गुन्हा दाखल […]

अधिक वाचा...

अविवाहीत गरोदर युवतीला घरच्यांनी जाळले जिवंत…

लखनौ (उत्तर प्रदेश): हापूड जिल्ह्यात एक अविवाहीत युवती गरोदर असल्याचे समजल्यानंतर तिच्याच घरच्यांनी तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत मुलगी ७० टक्के भाजली असून, गंभीर अवस्थेत तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हापूड जिल्ह्यातील बहादूरगड येथे ही घटना घडली आहे. एका २३ वर्षीय युवतीचे तिच्याच गावातील एका […]

अधिक वाचा...

Live Video: बसमध्ये चढताना पाकीट कसे मारले जाते पाहा…

चेन्नई (तमिळनाडू) : एका बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने पाकीट चोरले आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. काही चोर एवढे हुशार असतात की ते अशा पद्धतीने चोरी करतात ते कळतही नाही. पाकीटमारीचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यात खून केल्यानंतर किन्नर बनून राहणाऱ्यास युनिट १ ने केले जेरबंद…

पुणे (महेश बुलाख): पुणे जिल्ह्यातील म्हाळुंगे पोलिस ठाणे हद्दीत खून करून मुंबईत किन्नर बनून राहणा-या आरोपीस गुन्हे शाखा युनिट १ ने जेरबंद केले आहे. पोलिसांनी खुनाच्या गुन्हयाचा उलगडा केला असून, दोन आरोपींना गजाआड केले आहे. म्हाळुंगे पोलिस ठाणे हद्दीतील कुरुळी परिसरातून सचिन हरिराम यादव (वय १९, रा. पुणे-नाशिक रोड कुरुळी ता. खेड जि. पुणे) हा […]

अधिक वाचा...

हडपसर पोलिसांकडून परप्रांतीय टोळी गजाआड, लाखो रुपयांचे मोबाईल जप्त…

पुणे : पुणे शहरामध्ये गणेशोत्सवादरम्यान गर्दीमध्ये नागरिकांचे मोबाईल चोरण्याऱ्या परप्रांतीय टोळीला गजाआड करण्यात हडपसर पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या टोळीकडून तब्बल 16 लाख रुपये किंमतीचे 52 मोबाईल संच जप्त करण्यात आले आहे. हडपसर पोलिसांनी दोन दिवसात दोन टोळ्यांमधील 9 आरोपींना अटक करुन 72 मोबाईल जप्त केले आहेत. नागरिकांचे मोबाईल चोरणाऱ्यांना अटक करण्यासाठी वरिष्ठ […]

अधिक वाचा...

शिक्षकाने स्वतःच्या जागी ठेवला रोजंदारीवर निवृत्त शिक्षक; वर्गातच जुगार…

पालघर : तलासरी तालुक्यातील सूत्रकार डोंगरपाडा या जिल्हा परिषद शाळेतील एक धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. एका शिक्षकाने स्वतःच्या जागी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी रोजंदारीवर निवृत्त शिक्षकाला ठेवल्याचाही प्रकार घडला आहे. शाळेत मुलांना शिकवायला शासनाचा गलेलठ्ठ पगार घ्यायचा पण शाळेत न जाता मुलांना शिकवायला मजुरीवर शिक्षक ठेवायचा, असा प्रकार तलासरी तालुक्यात उघड झाला आहे. […]

अधिक वाचा...

दुसऱ्या विवाहाचे फोटो ठेवले स्टेटसला, पहिल्या डॉक्टर पत्नीची आत्महत्या…

छत्रपती संभाजीनगर : नवऱ्याने दुसरे लग्न करून, दुसऱ्या पत्नीसोबतचे लग्नाचे फोटो स्टेटसला ठेवल्याने पहिल्या डॉक्टर पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. २६) घडली आहे. डॉ. आयशा शेख (वय 25) असे मृत महिलेचे नाव आहे. बुलडाणा येथील डॉ. जैद याच्याशी डॉ. आयशा या युवतीचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले. दोघेही फिजिओथेरपिस्ट असून, लग्नानंतर शहरातील पडेगाव […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!