पार्डी (नस्करी) येथील दावा घाटंजी न्यायालयात खारीज…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील पार्डी (नस्करी) येथील वादी शंकर भिमा मरापे (वय ५८) यांनी घाटंजी येथील दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल केलेला दावा दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. कळमकर यांनी खारीज केला. प्रतिवादी गुलाब मोतीराम सिडाम यांचेतर्फे ॲड. विजय भुरे, ॲड. प्रेम राउत यांनी बाजू मांडली. तर वादी शंकर भिमा मरापे यांचेतर्फे ॲड. नेताजी राउत यांनी काम पाहिले.
पार्डी (नस्करी) येथील वादी शंकर भिमा मरापे व प्रतिवादी गुलाब मोतीराम सिडाम यांच्यात शेतीच्या ताब्याबाबत यवतमाळ येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात प्रकरण सुरू होते. या प्रकरणात गट नंबर ३७०, ६ हेक्टर ६४ आर शेतजमिनी पैकी २ हेक्टर ४२ आर शेतजमिनीचा सौदा झाला होता. तदनंतर सदर प्रकरण घाटंजी येथील दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. कळमकर यांच्या न्यायालयात पाठविण्यात आले.
सदर प्रकरणात मंगळवार ३० जुलै २०२४ रोजी न्यायालयाने आदेश पारित करुन गट न. ३७० पैकी शेतीचा ताबा दोन महिन्यात देण्याचे आदेश वादी शंकर भिमा मरापे यांस घाटंजी येथील दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. कळमकर यांच्या न्यायालयाने दिले आहे. प्रतिवादी गुलाब सिडाम यांचेतर्फे ॲड. विजय भुरे, ॲड. प्रेम राउत यांनी न्यायालयात बाजू मांडली.
धक्कादायक! कावड यात्रेतील नऊ भाविकांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू…
हृदयद्रावक! जळगावमध्ये तीन मुलांचा धरणात बुडून मृत्यू…
सातारा जिल्ह्यातील महिलेचा मृतदेह 7 दिवसांनी सापडला…
UPSC करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थीनीची दिल्लीत आत्महत्या; चिठ्ठीत म्हटले…
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात चौघांना वरिष्ठ वकीलाचा दर्जा…