Video: सीमा हैदर हिने देवाला हात जोडून घातलं साकडं; म्हणाली…

नवी दिल्ली : पाकिस्तानातून भारतात आलेली महिला सीमा हैदर हिने देवाला हात जाडून चांद्रयान 3 बाबत साकडं घातले आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारतासाठी आज (बुधवार) महत्त्वाचा दिवस असून, चांद्रयान 3 चं चंद्रावर लँडिंग होणार आहे. मिशन यशस्वी होण्यासाठी देशभर प्रार्थना केली जाते आहे. इस्त्रोच्या यशासाठी देवाकडेही साकडे घातले जातं आहे. सीमा […]

अधिक वाचा...

पुणे शहरात अट्टल घरफोडी चोराकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त…

पुणे (संदीप कद्रे): रेकॉर्ड वरील अट्टल घरफोडी चोरी करणाऱ्या गुन्हेगाराकडून ६,३०,७५० रु किमंतीचे सोन्याचे दागिने व इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात गुन्हे शाखा, युनिट २ला यश आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहरातील रॉबरी, घरफोडी चोरी, चैन स्नॅचींग तसेच पाहीजे/फरारी, तडीपार आरोपीचा शोध घेवुन रेकॉर्ड वरील गुन्हेगार चेकींग […]

अधिक वाचा...

एकतर्फी प्रेमातून आत्महत्या; विसरु शकत नाही, तिने केवळ वापर केला…

कोल्हापूर : एकतर्फी प्रेमातून विठ्ठल रोंगाप्पा जाधव (वय 21, रा. मलगड) या युवकाने आत्महत्या केली आहे. विठ्ठलचे एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. या घटनेची माहिती संबंधित मुलीच्या वडिलांना मिळाल्यानंतर त्यांनी निर्भया पथकाच्या माध्यमातून त्याचे समुपदेशन केले होते. यानंतर नैराश्यात गेलेल्या विठ्ठलने काजूच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. याबाबात चंदगड पोलिसांनी नोंद केली आहे. विठ्ठल जाधव […]

अधिक वाचा...

रेल्वेचा पूल कोसळून १७ कामगारांचा मृत्यू…

नवी दिल्ली: मिझोरामची राजधानी ऐजॉलजवळ निर्माणाधीन रेल्वे पूल कोसळल्याने 17 मजुरांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही 30 ते 40 मजूर अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मजुरांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढू शकतो, असेही सांगितले जात आहे. राजधानी आयजोलपासून २१ किमी अंतरावर बांधकाम सुरू असलेला पूल कोसळून ही दुर्घटना घडली […]

अधिक वाचा...

माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर…

मुंबईः व्यापारी मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अँटिलिया बॉम्ब प्रकरणी अटकेत असलेले माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने आज (बुधवार) जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांना जामीन नाकारला होता. त्यानंतर शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना दिलासा देत […]

अधिक वाचा...

नवऱ्याचे दुसरं लग्न सुरू असतानाच पत्नी मुलाला घेऊन पोहोचली लग्न मंडपात अन्…

अहमदनगर : पहिली पत्नी हयात असताना घटस्फोट न देता दुसरे लग्न करण्याच्या तयारीत असताना पहिल्या पत्नीने नवरदेवाला चांगलाच धडा शिकवला आहे. लग्न घटिकाजवळ येत असताना आणि वधू-वर बोहल्यावर चढत असतानाच पहिल्या बायकोची लग्नात एन्ट्री झाली आणि लग्नात एकच गोंधळ उडाला. अखेर हे लग्न बेकायदेशीर असल्याचे म्हणत पहिल्या पत्नीने आपल्या पतीचे दुसरे लग्न रोखून नियोजित वराची […]

अधिक वाचा...

लॉजवर मैत्रिणीसोबत असताना शक्तीवर्धक गोळ्यांच्या अतिसेवनाने युवकाचा मृत्यू…

भंडारा : लॉजवर मैत्रिणीसोबत रात्र घालवताना शक्तीवर्धक गोळ्यांच्या अतिसेवन केलेल्या युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणाची भंडारा पोलिसांनी नोंद केली असून, पुढील तपास करत आहेत. युवतीसोबत झालेल्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले होते. दोघेही भंडाऱ्यात भेटले आणि रात्र एकत्र घालवण्यासाठी एका लॉजवर थांबले होते. यावेळी युवकाने ‘वायग्रा’ गोळ्यांचं अतिसेवन केले होते. […]

अधिक वाचा...

युवकाने महागड्या मोटारीसह घेतली थेट खाडीमध्ये उडी अन् पुढे…

ठाणे: एका युवकाने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने महागड्या गाडीसह थेट कोलशेत येथील टॉप क्रूज ऑटोमोबाईल गॅरेज गणपती विसर्जन घाटा जवळ असलेल्या खाडीमध्येच उडी घेतली. पस्थित नागरिकांनी आपला जीव धोक्यात घालून त्याचा जीव वाचवला आहे. खाडीत साधारण सायंकाळी साडेचारच्या सुमारास एक 25 वर्षांचा युवक भरधाव वेगाने गाडी घेऊन थेट खाडीमध्ये शिरला. सुरुवातीला उपस्थितांना वाटलं की गाडीवरील चालकाचा […]

अधिक वाचा...

युवकांच्या त्रासाला कंटाळून मुलीने घेतला जगाचा निरोप; चिठ्ठीत म्हटले की…

नाशिक: सिन्नर तालुक्यातील शहा येथील दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी (ता. 22) मध्यरात्री उघडकीस आला आहे. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत गावातील तीन युवकांकडून त्रास होत असल्याचे नमूद केले होते. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. वैष्णवी नवनाथ जाधव (16) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव […]

अधिक वाचा...

नात्याला काळीमा! अल्पवयीन पुतणीवर बलात्कार; सात महिन्यांची गर्भवती…

बीड : एका 30 वर्षीय चुलत्याने अल्पवयीन पुतणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तिच्या वैद्यकीय तपासणी दरम्यान ती सात महिन्यांची गर्भवती असल्याचे समजल्यानंतर कुटुंबियांना धक्का बसला आहे. नात्याला काळीमा फासणारी घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. आरोपी चुलत्याचे काही दिवसापूर्वी विवाह झाला होता. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!