
पुणे शहरातील कंपनीमधील दरोड्यातील आरोपींना अटक; पाहा नावे…
पुणे (संदिप कद्रे): दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, गुन्हे शाखेच्या पथकाने हारको कंपनीमध्ये दरोडा टाकणाऱ्या गुन्हेगारांचा ०२ दिवसांमध्ये शोध घेवून, त्यांना अटक केली आहे. आरोपींकडून एकुण ०२ गुन्हे उघडकीस आणले असून, पुढील तपास करत आहेत.
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर येथे नेमणुकीस असलेले अशोक आटोळे, सहाय्यक पोलिस फौजदार यांना त्यांचे खास गुप्त बातमीदारा मार्फत २७/०४/२०२४ रोजी बातमी मिळाली की, हडपसर इडेस्ट्रीयल एरीआ, हडपसर, पुणे येथील हारको ट्रान्सफॉर्मस या कंपनीतुन दोन वेळा तांब्याच्या पट्या चोरी करणाऱ्यांपैकी त्याचे तोंड ओळखीचा अब्दुल साह (रा. चिखली, पुणे सध्या रा. नारायणगांव, पुणे) हा त्याचे साथीदारां सोबत पुन्हा हडपसर इंडेस्ट्रीयल एरीआ मधील दुसऱ्या कंपनीमध्ये चोरी करण्याचे उद्देशाने पाहणी करणेकरीता आलेला आहे. खात्रीशिर बातमी मिळाल्याने दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ कडील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी हडपसर इडेस्ट्रीयल एरिआमध्ये मिळालेल्या बातमीप्रमाणे
१) अब्दुल कलाम रहेमान साह, वय २४ वर्षे, रा. मोरेवस्ती, कुदळवाडी, चिखली, पुणे सध्या रा. कोल्हे मळा, नारायणगाव जि. पुणे मुळगाव मु.पो. कळजा, ता.
बेलवाह, जि. सिध्दार्थनगर, उत्तरप्रदेश
२) प्रेमसागर सुमीरन कनोजिया, वय १९ वर्षे, रा. नेवाळेवस्ती, चाळीस रुम, कुदळवाडी, चिखली, पुणे मुळगाव रेहाराअर्फा, भेसाही, ता. इटवा, जि. सिध्दार्थनगर, उत्तरप्रदेश
३) शकील अहमद मन्सुरी, वय २४ वर्षे, रा. म्हाडा बिल्डींग, फ्लॅट नं. ५५, क्रांतीनगर, साकीनाका, मुंबई मुळगाव मु. खैरा, पोस्ट ढोसळ ता. भानपुर, जि. बस्ती, उत्तरप्रदेश
४) रिजवान ऊर्फ अहमद रामुल्ला खान, वय १९ वर्षे, रा. सदर मुळगांव मु. धुनिया, पोस्ट बडनी, ता. शौहरतगढ, जि. सिध्दार्थनगर, उत्तरप्रदेश
५) सोमनाथ गणपत कोडीतकर, वय ३८ वर्षे, रा. जैन मंदिर, दुग्गड पुष्प विद्यालयामागे, चाळ, रुम नं. १०, जागडे गिरणी शेजारी, कात्रज, पुणे मुळगाव मु. पो. हिरपुडी,
ता. वेल्हा, जि. पुणे
६) अनिल अनंता रेणुसे, वय ३४ वर्षे, रा. वासवंडे यांचे घरात, राममंदिराशेजारी, पहिला मजला, आंबेगाव, पुणे मुळगाव मु.पो. पाबे, रामवाडी, ता. वेल्हा जि. पुणे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर ताब्यात घेतलेले आरोपी हे घटनास्थळी असलेल्या सी. सी. टी. व्ही. फुटेजमधीलच असल्याची खात्री झालेली आहे. सदर आरोपी
यांचेकडून चोरी केलेल्या तांब्याच्या दोन पट्या, व गुन्ह्यात वापरलेला एक टेम्पो, एक दुचाकी गाडी, तसेच एक पक्कड वजा कटर, असा एकुण ३,९०,२०० /- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
वरील आरोपी यांचेकडुन खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.
१) वानवडी पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नं. २४८ / २०२४ भा.द.वि. कलम ४५७, ३८०
२) वानवडी पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नं. ३११ / २०२४ भा.द.वि. कलम ३९५ प्रमाणे
सदरची कारवाई ही पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त प्रविण पवार, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे, शैलेश बलकवडे, पोलिस उप आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे, सहा पोलिस आयुक्त गुन्हे- २ सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय वाघमारे, पोलिस अंमलदार उदय काळभोर, राजेश अभंगे, दिनकर लोखंडे, अशोक आटोळे, राजेश लोखंडे, विनायक रामाणे, दत्तात्रय खरपुडे, ज्ञानदेव गिरमकर, सुदेश सपकाळ, गणेश लोखंडे, शिरीष गोसावी, अमोल सरतापे, राहुल इंगळे, संदीप येळे, विनायक येवले, विक्रांत सासवडकर यांनी केली आहे.
पुणे शहरात पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू; गुन्हा दाखल…
पुणे पोलिस आयुक्तांनी एक लाख रुपयांच्या बक्षिसाची रक्कम दिली विभागून…
पुणे शहरात काडीपेटी मागितली म्हणून केला गोळीबार…
पुणे पोलिस आयुक्तांनी गुन्हेगारांना दिली तंबी…
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी तृतीयपंथींबाबत घेतला मोठा निर्णय…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

