नात्याला काळीमा! अल्पवयीन पुतणीवर बलात्कार; सात महिन्यांची गर्भवती…

बीड : एका 30 वर्षीय चुलत्याने अल्पवयीन पुतणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तिच्या वैद्यकीय तपासणी दरम्यान ती सात महिन्यांची गर्भवती असल्याचे समजल्यानंतर कुटुंबियांना धक्का बसला आहे. नात्याला काळीमा फासणारी घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

आरोपी चुलत्याचे काही दिवसापूर्वी विवाह झाला होता. मात्र, त्याची पत्नी त्याच्यासोबत राहत नसल्याने तो आपल्या भावाच्या घरी राहत होता. घरात कोणी नसताना त्याने पीडित अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. या प्रकाराची कोणाला माहिती दिल्यास आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी आरोपीकडून देण्यात येत होती. त्यामुळे पीडित अल्पवयीन मुलगी अत्याचार सहन करत होती. पण, अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखू लागल्याने उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.

या सर्व प्रकरणानंतर पीडित मुलीच्या आई वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपी चुलत्यावर अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची वाच्यता झाल्याने आरोपी काकाने पळ काढला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! सरकारी अधिकाऱ्याकडून राहिली मित्राची मुलगी गरोदर…

सख्ख्या भावाकडून अल्पवयीन बहिण राहिली गरोदर…

हनीमूनच्या दुसऱ्याच दुसऱ्याच दिवशी नवरीने दिला बाळ जन्म…

पुणे जिल्हा हादरला! पित्याचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार…

धक्कादायक! सावकाराने पतीसमोरच पत्नीवर केला बलात्कार…

धक्कादायक! अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून बलात्कार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!