एकतर्फी प्रेमातून आत्महत्या; विसरु शकत नाही, तिने केवळ वापर केला…

कोल्हापूर : एकतर्फी प्रेमातून विठ्ठल रोंगाप्पा जाधव (वय 21, रा. मलगड) या युवकाने आत्महत्या केली आहे. विठ्ठलचे एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. या घटनेची माहिती संबंधित मुलीच्या वडिलांना मिळाल्यानंतर त्यांनी निर्भया पथकाच्या माध्यमातून त्याचे समुपदेशन केले होते. यानंतर नैराश्यात गेलेल्या विठ्ठलने काजूच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. याबाबात चंदगड पोलिसांनी नोंद केली आहे.

विठ्ठल जाधव याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. यामध्ये त्या मुलीने माझा केवळ वापर केला. निर्भया पथकाची भीती दाखवून त्यांनी माझ्याकडून तिला परत मेसेज न करण्याचे जबरदस्तीने लिहून घेतले आहे. तिला मी विसरू शकत नसल्याने शेवटचा हा पर्याय निवडला. आय एम सॉरी. विठ्ठल जाधव जाधव याने आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यामधील मांगले येथील तुषार पांढरबळे या तरुणाने प्रेमकरणातून वारणा नदीत उडी मारून आत्महत्या केली होती. त्याचा मृतदेह कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यामधील भेंडवडेमध्ये वारणा नदीपात्रात चौथ्या दिवशी सापडला होता. तुषारने प्रेम प्रकरणातून मांगले-सावर्डे दरम्यानच्या बंधाऱ्यावरुन वारणा नदीपात्रात पुराच्या पाण्यात उडी मारली होती.

प्रेमसंबंधातूनच अंजलीची हत्या; प्रियकराने तपासादरम्यान सांगितले…

बापरे! प्रेमास नकार देणाऱ्या मुलीची आईसमोरच केली हत्या…

प्रेम प्रकरणातून नदीत उडी मारलेल्या युवकाचा चौथ्या दिवशी सापडला मृतदेह…

प्रेमविवाहाला परवानगी न दिल्याने मुलीने केली वडिलांना बेदम मारहाण…

प्रेमविवाह! पोलिसांना मोटारीचा दरवाजा उघडताच बसला धक्का…

प्रेमविवाह ठरला अन् लग्नाच्या दिवशी नवरदेवाने ठोकली मेहुणीसोबत धूम…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!