पुणे शहरात अट्टल घरफोडी चोराकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त…

पुणे (संदीप कद्रे): रेकॉर्ड वरील अट्टल घरफोडी चोरी करणाऱ्या गुन्हेगाराकडून ६,३०,७५० रु किमंतीचे सोन्याचे दागिने व इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात गुन्हे शाखा, युनिट २ला यश आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहरातील रॉबरी, घरफोडी चोरी, चैन स्नॅचींग तसेच पाहीजे/फरारी, तडीपार आरोपीचा शोध घेवुन रेकॉर्ड वरील गुन्हेगार चेकींग करण्याबाबत महत्वाच्या सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने गुन्हे शाखा युनिट-२ प्रभारी अधिकारी नंदकुमार बिडवई, म.सहा.पो.नि. वैशाली भोसले व युनिट २ कडील पोलिस अंमलदार पो.हवा. १७८० मोकाशी, पो.हवा. २५७२ जाधव, पो. ना. ६६०७ सरडे, पो. शि.८४०३ सोनुने, पो.शि. ८१३६ जाधव, पो. शि. ८८३४ चव्हाण यांची टिम तयार करुन त्यांना महत्वाचे मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या.

पेट्रोलींग दरम्यान युनिट-२ कडील पोलिस अमंलदार गजानन सोनुने व संजय जाधव यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रेकॉडवरील अट्टल घरफोडी चोरी करणारा इसम नामे जयवंत ऊर्फ जायड्या गायकवाड हा मिनाताई ठाकरे वसाहती येथील भिम दिप मित्रमंडळाचे जवळ चोरीचे सोन्याचे दागीने विकण्यासाठी टी.व्ही.एस. (अपाची) कंपनीची गाडी क्रमांक एम.एच. १४ एफ.एल. ७७२७ या गाडीसह आलेला आहेत. सदर बाबत युनिट २, प्रभारी मा. पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांना कळविली असता त्यांनी कायदेशिर कारबाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर युनिट २ कडील अधिकारी व अमंलदार यांनी बातमीचे ठिकाणी खाजगी वाहनाने जावून सापळा रचुन शिताफीने २०/०८/२०२३ रोजी १०.३० वा. ताब्यात घेवून त्यास त्याचे नांव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव जयवंत ऊर्फ जायड्या गोवर्धन गायकवाड वय ३४ वर्षे, रा. डी.पी. रोड, आंबेडकर वसाहत, सुरेश प्रोव्हीजन चे बाजुला, औंध पुणे असे असल्याचे सांगीतले.

पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यातून १०७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, टि.व्ही. एस. (अपाची) दुचाकी गाडी, दागिने वजन करण्याची इलेक्ट्रॉनिक मशिन व घरफोडी चोरी करण्यासाठी वापरलेले हत्त्यारे असा सर्व मिळुन किमंत ६,३०,७५०/- रु चा मुद्देमाल मिळुन आलेला आहे. समर्थ पोलिस स्टेशन गु.र.नं. १८६ / २०२३ भा.द.वि. कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हयाची उकल करण्यात युनिट-२ ला यश आले आहे. त्यास वैदयकीय तपासणी करुन, पुढील तपासकामी समर्थ पोलिस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आलेले आहेत. सदर आरोपी हा रेकॉर्ड वरील अट्टल घरफोडी चोरी करणारा इसम असुन तो गेल्या महिन्यामध्ये जेल मधून जामीनावर बाहेर आलेला होता. त्याचेवर आज तागायत घरफोडी चोरीचे बरेच गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदिप कर्णिक, अप्पर पोलिस आयुक्त, गुन्हे रामनाथ पोकळे, पोलिस उप-आयुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहा. पो. आयुक्त गुन्हे – १ सुनिल तांबे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई, म सपोनि वैशाली भोसले, विशाल मोहिते, पोलिस अंमलदार गजानन सोनुने, अमोल सरडे, पुष्पेंद्र चव्हाण, संजय जाधव, उज्वल मोकाशी, निखिल जाधव, प्रमोद कोकणे, गणेश थोरात सर्व नेमणुक गुन्हे शाखा युनिट-२, पुणे शहर यांनी केली आहे.

पुणे शहरातील महिलेच्या पतीचे कोरोनात निधन, अल्पवयीन युवकासोबत शरीरसंबंध अन्…

पुणे शहरात फायनान्सची वाहने कमी किंमतीत देतो म्हणून मोठी फसवणूक…

पुणे शहरातील ३५ गुन्हेगारांना केले हद्दपार…

पुणे शहरातील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; परदेशी युवतींची सुटका…

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!