युवकांच्या त्रासाला कंटाळून मुलीने घेतला जगाचा निरोप; चिठ्ठीत म्हटले की…

नाशिक: सिन्नर तालुक्यातील शहा येथील दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी (ता. 22) मध्यरात्री उघडकीस आला आहे. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत गावातील तीन युवकांकडून त्रास होत असल्याचे नमूद केले होते. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. वैष्णवी नवनाथ जाधव (16) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे.

शहा या गावातील श्री भैरवनाथ हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्गात वैष्णवी शिकत होती. तिने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत गावातील 3 तरुणांकडून त्रास होत असल्याचे नमूद केले होते. तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून वावी पोलिस ठाण्यात तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

वैष्णवी हिने आत्महत्या करण्यापूर्वी संशयित आरोपी वैभव विलास गोराणे (वय 18), अंकुश शिवाजी धुळसैंदर (वय 18) व एका अल्पवयीन मुलाच्या नावाचा चिठ्ठीमध्ये उल्लेख करून आत्महत्येचे कारण स्पष्ट केले आहे. संशयित आरोपी वैभव गोराणे याने त्याच्या मित्रांबरोबर मृत वैष्णवी हिच्या घरी जाऊन तिला व तिच्या वडिलांना दमदाटी करत घरात जाऊन गच्ची पकडून आणि वैष्णवी हिला तुला जगण्याचा अधिकार नाही, तू जीव दे नाहीतर आम्ही तुझा जीव घेतो’ अशी धमकी देत तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. यानंतर वावी पोलिसांनी संशयित वैभव गोराणे आणि त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.

नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणी दापोली न्यायालयाचा आरोपीला दणका…

मुंबईमधून शिक्षिका मारिया खान बेपत्ता; काही अघटित तर नाही ना…

प्रेमसंबंधातूनच अंजलीची हत्या; प्रियकराने तपासादरम्यान सांगितले…

बापरे! प्रेमास नकार देणाऱ्या मुलीची आईसमोरच केली हत्या…

प्रेमविवाहाला परवानगी न दिल्याने मुलीने केली वडिलांना बेदम मारहाण…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!