रेल्वेचा पूल कोसळून १७ कामगारांचा मृत्यू…
नवी दिल्ली: मिझोरामची राजधानी ऐजॉलजवळ निर्माणाधीन रेल्वे पूल कोसळल्याने 17 मजुरांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही 30 ते 40 मजूर अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मजुरांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढू शकतो, असेही सांगितले जात आहे.
राजधानी आयजोलपासून २१ किमी अंतरावर बांधकाम सुरू असलेला पूल कोसळून ही दुर्घटना घडली आहे. आज (बुधवार) सकाळी दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली तेव्हा पुलाचे काम करण्यासाठी तिथे अनेक कामगार उपस्थित होते. काहीजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती पुढे येत आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे.
रेल्वे ब्रिजचे काम साइरांगजवळ कुरुंग नदीवर सुरू होते. या ब्रिजमुळे बैराबी आणि साइरंग या दोन भागांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रेल्वेचा जो पिलर कोसळला आहे त्याची उंची जवळपास १०४ मीटर एवढी उची आहे. हा पूल दिल्लीच्या कुतुबमिनारपेक्षा उंच आहे. या पुलावरून रेल्वे वाहतूक सुरू झाल्यानंतर मिझोराम देशाच्या विशाल रेल्वे नेटवर्कशी जोडला जाणार आहे, असा दावा प्रशासनाने केला आहे. पण, या पुलाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच दुर्घटना घडली आहे.
“Under construction railway over bridge at Sairang, near Aizawl collapsed today; at least 17 workers died: Rescue under progress…,” tweets Mizoram CM Zoramthanga https://t.co/xlcY4SgjVo pic.twitter.com/EbUOLt5h0N
— ANI (@ANI) August 23, 2023
समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना; 18 जणांचा मृत्यू…
पुणे जिल्ह्यात विहिरीत कोसळला मातीचा ढिगाळा; चौघे अडकले…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…