लॉजवर मैत्रिणीसोबत असताना शक्तीवर्धक गोळ्यांच्या अतिसेवनाने युवकाचा मृत्यू…

भंडारा : लॉजवर मैत्रिणीसोबत रात्र घालवताना शक्तीवर्धक गोळ्यांच्या अतिसेवन केलेल्या युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणाची भंडारा पोलिसांनी नोंद केली असून, पुढील तपास करत आहेत.

युवतीसोबत झालेल्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले होते. दोघेही भंडाऱ्यात भेटले आणि रात्र एकत्र घालवण्यासाठी एका लॉजवर थांबले होते. यावेळी युवकाने ‘वायग्रा’ गोळ्यांचं अतिसेवन केले होते. यानंतर युवकाचा रक्तदाब वाढल्याने हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. मृत युवक 27 वर्षीय असून तो नागपूर जिल्ह्यातील आहे. तर, त्याची मैत्रीण 23 वर्षीय असून ती गोंदिया जिल्ह्यातील आहे. दोघांनीही एकमेकांची आयुष्यभर साथ द्यायचे आणि लग्न करायचे अशा आणाभाका घातल्या होत्या. त्यामुळे एकदा भेटायचे असे दोघांनीही ठरवले होते. युवक नागपूर येथून तर युवती गोंदियातून भंडाऱ्यात पोहचली होती.

युवक आणि युवती दिवसभर भंडाऱ्यात सोबत फिरले. खरेदी केली आणि रात्र एकत्र घालवायची म्हणून दोघांनीही भंडारा येथील लॉजवर थांबले होते. यावेळी युवकाने मेडिकलमधून शक्तीवर्धक गोळ्या खरेदी केल्या. मैत्रिणीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी त्याने गोळ्याचे सेवन केले. गोळ्यांचे अतिसेवन केल्याने तरुणाचा अचानक रक्तदाब वाढला आणि त्यातच त्याला हृदयविकाराचा झटका झाल्याने युवकाचा मृत्यू झाला.

दरम्यान, मैत्रिणीने लॉजमधील कर्मचाऱ्यांच्या मदतीने युवकाला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणाची भंडारा पोलिसांनी नोंद केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच युवकाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Video: नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये रंगेहात पकडलं अन् पुढे…

प्रियकर आणि प्रेयसी ओयो हॉटेलमध्ये अन् काही वेळानंतर…

प्रेमविवाह ठरला अन् लग्नाच्या दिवशी नवरदेवाने ठोकली मेहुणीसोबत धूम…

प्रेमसंबंधात अडथळा! पुणे शहरात वेबसिरिज पाहून केला खून अन् मृतदेह…

प्रियकरासह त्याच्या मित्रांनी विद्यार्थिनीचे न्यूड फोटो केले व्हायरल…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!