
पोक्सो गुन्ह्यातील संशयित आरोपी शिक्षकाचा अटक पुर्व जामीन मंजूर…
घाटंजी-यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : अंजी (नाईक) येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या पोक्सो गुन्ह्यातील संशयित आरोपी शिक्षकाचा अटक पुर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यु. एस. बघेले यांनी बुधवारी १५,००० रुपयाच्या जात मुचलक्यावर मंजूर केला.
घाटंजी तालुक्यातील अंजी (नाईक) येथील एका शिक्षकाने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी घाटंजी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी शिक्षक वसंत पत्रे विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणात संबंधित शिक्षकाने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अटक पुर्व जामीन अर्ज दाखल केला होता. सदर प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यु. एस. बघेले यांच्या समक्ष झाली. आरोपीच्या वकीलाचा युक्तीवाद ग्राह्य ठरवून संशयित आरोपी शिक्षक वसंत पत्रे यांचा अटक पुर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. आरोपीची बाजू ॲड. ए. व्ही. चिरडे यांनी मांडली.
अंजी (नाईक) येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी घाटंजी पोलीस ठाण्यात अपराध क्रमाक ५८३/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ७४ व ७५ तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ८ व १२ पोक्सो अंतर्गत संशयित आरोपी वसंत पत्रे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यु. एस. बघेले यांनी खालील अटीवर व शर्तीवर अटक पुर्व जामीन मंजूर केला आहे. संशयित आरोपी शिक्षकाने प्रत्येक रविवारी सकाळी ११ ते दुपारी १ वाजता घाटंजी पोलीस ठाण्यात हजेरी देणे, संशयित आरोपी ने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष साक्षीदारांवर दबाव आणू नये, तसेच घाटंजी पोलीसांना तपास कार्यात सहकार्य करावे, असे आदेश न्यायाधीश यु. एस. बघेले यांनी दिले आहेत.
नांदेडमधून अपहरण केलेली मुलगी सापडली; धक्कादायक कारण समोर…
बीड! व्हिडीओ व्हायरल म्हणून युवकाची छाटली बोटं…
वाल्मिक कराडचा राइट हँडचं अघोरी कृत्य; राम नाम सत्य है…
धक्कादायक! धुळ्यातील जोडप्याने कोकणातील नदीत घेतली उडी…
मुंबईतील शिक्षिकेचे व्हिडिओ कॉल करून विद्यार्थ्यांसोबत अश्लील चाळे…

