हृदयद्रावक! एकमेकांना मिठी मारल्याने चौघांचा बुडून मृत्यू…

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बस्तवडेत वेदगंगा नदीवर असणाऱ्या बंधाऱ्यात बुडून चौघांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

विद्यार्थ्याला वाचवण्याच्या नादात एकमेकांना मिठी मारल्याने हा भयंकर प्रकार घडला आहे. जितेंद्र विलास लोकरे (वय 36, रा. मुरगूड ता. कागल) रेश्मा दिलीप येळमल्ले (वय 34), हर्ष दिलीप येळमल्ले (वय 17, दोघे रा. अथणी, कर्नाटक) आणि सविता अमर कांबळे (वय 27 रा. रुकडी, ता. हातकलंगले) अशी मृतांची नावे आहेत. मृतांमध्ये मुरगूडचे जितेंद्र लोकरे त्यांची बहीण, बहिणीचा मुलगा आणि मामाचा मुलीचा समावेश आहे.

आणूर गावच्या जत्रेसाठी हे सर्वजण जमले होते. शुक्रवारी (ता. 17) दुपारच्या सुमारास ते वेदगंगा नदीकडे गेले होते. काळम्मावाडी धरणाचे पाणी वेदगंगा नदीत सोडल्याने नदीतील पाण्याचा प्रवाह मोठा होता. कपडे धुण्यासाठी आणि आंघोळीसाठी नदीत उतरले असतानाच हर्ष खोल पाण्यामध्ये बुडू लागला होता. आरडाओरडा करण्यात आल्यानंतर शेजारी असणारा मामा जितेंद्र पाण्यात उतरला. पाठोपाठ रेश्मा, साधना व सविता सुद्धा उतरल्या. मात्र, पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने भीतीपोटी एकमेकांना मिठी मारल्याने नदीत बुडाले.

चौघे बुडताना काठावर असलेल्या जितेंद्र लोकरे यांच्या मुलीने पाहिल्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. यावेळी मासे पकडण्यास आलेल्या अवधूत यांनी गावातील प्रमोद पाटील यांना बोलावून नदीत उडी मारली. साधना लोकरे यांना वाचवण्यात त्यांना यश आले. तसेच तिघांचे मृतदेह त्यांनी काठावर आणले. हर्षला शोधण्याचे काम सुरू होते.

हृदयद्रावक! आईच्या डोळ्यात देखत मुलगी आणि बहिणीचा मृत्यू…

हृदयद्रावक Video! वलिडांना अमानुषपणे केली मारहाण, सोडला जीव…

हृदयद्रावक! एक चिमुकली पाण्यात पडली अन् पुढे तिघींचा मृत्यू…

हृदयद्रावक! मायलेकीचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी केला आक्रोश…

हृदयद्रावक! तलावाजवळ मुलांची कपडे दिसली अन् फुटला हंबरडा…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!