शिवा शर्मा हत्याकांडातील मुख्य सूत्रधार श्रद्धा दुबे हिला नागपुरात अटक…

नागपूर: लखनौमध्ये (उत्तर प्रदेश) झालेल्या शिवा शर्मा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी मॉडेल श्रद्धा दुबे हिला नागपुरातून अटक करण्यात आली आहे. तिच्यासह तिची बहीण आणि चालकादेखील बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि मॉडेल श्रद्धा दुबे, तिची बहीण रश्मी दुबे आणि त्यांचा चालक तन्वीर अली ऊर्फ दानिश यांना नागपुरात अटक करण्यात आली आहे. रेस्टॉरंट मालक शिवा शर्मा यांच्या मृत्यूच्या प्रकरणाशी संबंधित ही अटक असल्याचे लखनौचे पोलीस आयुक्त तरुण गौबा यांनी सांगितले.

उत्तर प्रदेश पोलिसांचे एसटीएफ आणि नागपूर पोलिसांनी नागपूरातील बेलतरोडी भागातून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. उत्तर प्रदेश पोलीस तिघांचा ट्रांझीट रिमांड घेऊन तिघांना लखनौला घेऊन जाणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

दरम्यान, लखनौमध्ये 9 ऑक्टोबर रोजी इमारतीच्या चौथ्या माळ्यावरून खाली कोसळल्याने शिवा शर्माचा मृत्यू झाला होता. मात्र या प्रकरणावर संशय व्यक्त करत पोलिसांकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आले होते. पोलिसांच्या तपासात नंतर ही घटना केवळ दुर्घटना नसून हत्या असल्याचे समोर आले होते. तेव्हापासून शिवा शर्माची मैत्रीण असलेली मॉडेल श्रद्धा दुबे, तिची बहीण रश्मी दुबे आणि त्यांचा ड्रायव्हर दानिश फरार झाले होते. अखेर दोन दिवसांपूर्वी (19 ऑक्टोबर) कानपूरच्या एका हॉटेलमधून भाड्याच्या वाहनाने तिघेही नागपुरात दाखल झाले होते. या माहितीच्या आधारे नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने उत्तर प्रदेश पोलिसांच्या सूचनेनंतर नागपूरातील गणेश पेठ परिसरात उत्तर प्रदेशातून आलेले ते वाहन शोधून काढले. त्या वाहनाच्या चालकाने तिघांना गणेश पेठ परिसरात सोडण्याचे सांगितल्यानंतर तिघांचा नागपूर शहरात शोध घेण्यात आला. अखेर तिघेही एका इ-रिक्षामध्ये बसून गणेश पेठ परिसरातून चीचभुवन परिसरात गेल्याचे दिसून आले.

उत्तर प्रदेश एसटीएफ आणि नागपूर पोलिसांनी मिळून तिघांना बेलतरोडी भागातील एका इमारती जवळून ताब्यात घेतले. पीडित तरुणाची आई, रंजना शर्मा यांनी मॉडेल श्रद्धा दुबेच्या अटकेला “न्यायाच्या दिशेने पहिले पाऊल” असे संबोधले आणि उत्तर प्रदेश पोलीस, विशेष कृती दल (STF) तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे त्यांच्या प्रयत्नांबद्दल आभार मानले आहेत.

मोठा ट्विस्ट! मॉडेल श्रद्धा दुबेच्या खोलीत आढळल्या शक्तीवर्धक गोळ्या…

पोलिसांनी वेश्याव्यवसायाचा केला भांडाफोड; हॉटेलमधून अभिनेत्रीची सुटका…

मॉडेल त्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; पोलिसांचा मोठा निर्णय…

विवाहीत प्रियकरच निघाला मॉडेल शीतल हिचा खूनी…

प्रसिद्ध मॉडेलची हत्या; नग्नावस्थेत सापडला मृतदेह…

मॉडेलने घातला अनेक युवकांना लाखो रुपयांचा गंडा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!