हैदराबादच्या ‘निम्स’ रुग्णालयातील डॉक्टरवर एसीबीचा छापा; कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस…

हैदराबाद: तेलंगणा लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोने (एसीबी) हैदराबादमधील निझाम्स इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे (निम्स) अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक आणि अतिरिक्त प्राध्यापक डॉ. नोरी लक्ष्मी भास्कर यांच्या कथित बेहिशेबी मालमत्तेची चौकशी तीव्र केली असून, शोधमोहिमेत संशयित बेनामी आणि त्यांच्या साथीदारांशी संबंधित मालमत्ता आणि आर्थिक नोंदी उघडकीस आल्या आहेत. हैदराबाद येथील विशेष पोलीस आस्थापना आणि एसीबी प्रकरणांसाठीच्या प्रधान विशेष […]

अधिक वाचा...

३८ वर्षांपूर्वीच्या बँकेवरील दरोडा प्रकरणी केरळच्या ७६ वर्षीय व्यक्तीला १३ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा…

कलपेट्टा (केरळम): वायनाड येथील नल्लूरनाड सर्विस कोऑपरेटिव्ह बँकेत १९८८ मध्ये पडलेल्या दरोड्यात सहभाग असल्याबद्दल दोषी ठरलेल्या, एका ७६ वर्षीय व्यक्तीला येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने १३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि १६,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. न्यायाधीश एल. जयवंत यांनी मंगळवारी कोल्लम येथील रहिवासी अब्दुल समद याला या प्रकरणात शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास […]

अधिक वाचा...

खाटिकानं मैत्रिणीला संपवलं अन् 9 तुकडे करत फेकले कालव्यात; पण…

अमरावती: एका खाटिकानं पैशाच्या वादातून महिलेचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेची हत्या केल्यानंतर आरोपीनं तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते विजयवाडा येथील कालव्यात टाकले. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी आरोपीनं विविध प्रयत्न केले. पण पोलिसांनी त्याला अटक केली. या हत्याकांडामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. कल्याणी असे मृत महिलेचे नाव आहे. इब्राहिमपुरामध्ये एक अज्ञात […]

अधिक वाचा...

पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन लंडनला पळालेल्या निलेश घायवळ याला क्लिन चीट…

पुणे: कुख्यात गुन्हेगार निलेश घायवळ हा बनावट पासपोर्टच्या आधारे पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन लंडनला फरार झाला होता. त्यानंतर आता निलेश घायवाळ आणि त्याच्या साथीदारांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. कारागृहात असताना खंडणी मागितल्याच्या प्रकरणात मोकोका न्यायालयाने निलेश घायवळसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे आता निलेश घायवळ याला मोठा दिलासा मिळाला आहे. 2020 च्या […]

अधिक वाचा...

माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे याला जामीन मंजूर; तब्बल साडे पाच वर्षांनंतर…

मुंबई : अल्टा माउंटरोड बॉम्बकांड आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी सचिन वाझे याला मोठा दिलास मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडून त्याला जामीन मंजूर झाला आहे. तब्बल साडे पाच वर्षांनंतर तो तुरूंगाबाहेर येणार आहे. अल्टा माउंट रोडवर स्फोटके ठेवणे तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे याच्यावर गंभीर आरोप आहेत. मुंबई येथील मनसुख हिरेन हत्या […]

अधिक वाचा...

तीन कोटींचे बेकायदा फटाके जेएनपीए बंदरावर जप्त; डीआरआय अधिकाऱ्यांकडून मुख्य संशयिताला अटक…

उरण: नवी मुंबईतील जेएनपीए बंदरावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मोठी कारवाई करत सुमारे तीन कोटी रुपये किमतीचे १० हजार किलोग्रॅम बेकायदेशीर फटाके जप्त केले. गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी संशयास्पद आयात केलेला कंटेनर रोखून त्याची तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणातील मुख्य सिंडिकेट सदस्याला अटक करण्यात आली आहे. तपासणीदरम्यान कंटेनरच्या सुरुवातीच्या तीन […]

अधिक वाचा...

मोबाईल लिंकद्वारे वाहतूकदाराला गंडा; सायबर गुन्हेगाराविरुद्ध गुन्हा दाखल…

पनवेल: कळंबोलीतील एका वाहतूक व्यावसायिकाला, गाडीवर वाहतूक चलन बजावल्याचा बनावट संदेश पाठवून त्यातील लिंकद्वारे मोबाईल हॅक करून त्याच्या बँक खात्यातून ५ लाख २० हजार रुपये लंपास केल्याची घटना समोर आली आहे. तळोजा पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरू केला आहे. तक्रारदार कासीम कारदअली शेख यांचा तळोजा एमआयडीसीत ट्रान्सपोर्टचा व्यवसाय […]

अधिक वाचा...

हवालदारावर हल्ला केल्याप्रकरणी ‘आप’चे सौरभ भारद्वाज, जरनैल सिंग यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल…

नवी दिल्ली: दिल्ली सरकारचे मंत्री परवेश वर्मा यांच्या कानशिलात मारल्याची घटना आता वाऱ्यासारखी पसरते आहे. एका पोलिस हवालदारावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यात सौरभ भारद्वाज, जरनैल सिंग आणि ‘आप’च्या कार्यकर्त्यांची नावे आहेत. साहिब सिंग यांच्या विरोधातही एफआयआर दाखल करण्यात आली आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी […]

अधिक वाचा...

प्रियकर, मत्सर आणि खून; २०० वर्षांत पहिल्यांदाच अमेरिकेत महिलेला मृत्यूदंड…

टेनेसी: अमेरिकेतील टेनेसी राज्यात ३२ वर्षांपूर्वी एका भीषण गुन्ह्यासाठी दोषी ठरलेल्या क्रिस्टा पाईक नावाच्या महिलेला ३० सप्टेंबर रोजी मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात येणार आहे. क्रिस्टा पाईक (वय ५०) हिला प्राणघातक इंजेक्शन देऊन मृत्युदंडाची शिक्षा दिली जाईल. गेल्या २०० वर्षांत टेनेसीच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिला कैद्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली जात आहे. यापूर्वी राज्यात १८१९ साली एका महिलेला […]

अधिक वाचा...

पुणे पोलिस ॲक्शन मोडमध्ये, डीजे वाजवणाऱ्या मंडळांना धडाधड पाठवल्या नोटीसा…

पुणे: गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिक्षेपकांच्या (साऊंड सिस्टीम) आवाजाची मर्यादा कायम राहावी यासाठी पुणे पोलिसांनी ‘चार बेस, चार टॉप’चा नियम लागू केला होता. मात्र, प्रत्यक्ष विसर्जन मिरवणुकीत अनेक ठिकाणी या नियमांचे उल्लंघन करत आवाजाची मर्यादा ओलांडल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी दोन दिवसांत १,२२४ गणेश मंडळांच्या आवाजाचे ‘रीडिंग’ घेतले असून, आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!