पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन लंडनला पळालेल्या निलेश घायवळ याला क्लिन चीट…

पुणे: कुख्यात गुन्हेगार निलेश घायवळ हा बनावट पासपोर्टच्या आधारे पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन लंडनला फरार झाला होता. त्यानंतर आता निलेश घायवाळ आणि त्याच्या साथीदारांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. कारागृहात असताना खंडणी मागितल्याच्या प्रकरणात मोकोका न्यायालयाने निलेश घायवळसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे आता निलेश घायवळ याला मोठा दिलासा मिळाला आहे. 2020 च्या एका प्रकरणात निलेश घायवळविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

निलेश घायवळ हा कारागृहात असताना संतोष धुमाळ याने फिर्यादीकडे भावाच्या रॅलीसाठी जीप देण्याच्या नावाखाली खंडणी मागितल्याचा आरोप होता. या प्रकरणात उच्च न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढत पोलिसांना फिर्यादीचा पुन्हा एकदा जबाब नोंदवण्याचे आदेश दिले होते. परंतू फिर्यादीने संपूर्ण घटनाक्रम नाकारला असून अशा प्रकारे गुन्हा घडला नसल्याचे नमूद केले अन् फिर्यादीने तपास यंत्रणेने दबाव टाकून फिर्याद नोंदवल्याचा दावा केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

दरम्यान, कोथरूडमध्ये झालेल्या घटनेनंतर निलेश घायवळविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. मात्र, त्याने पासपोर्टसाठी अर्ज करताना आपल्या आडनावात स्पेलिंग मिस्टेक करून त्याने ‘घायवळ’ ऐवजी ‘गायवळ’ असे नाव वापरल्याचे आढळले होते. याचा फायदा घेऊन निलेश घायवळ युरोपमध्ये पळून गेला होता. त्यानंतर तो परत आला नाही.

निलेश घायवळ याने पळ काढला असला तरी त्याचा भाऊ सचिन घायवळ याला राजस्थानमधून अटक करण्यात आली होती. सचिन घायवळवर देखील खून, खंडणी आणि इतर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल होते. राजस्थान येथील सिकर जिल्ह्यातून सचिन घायवळला ताब्यात घेतले होते. मात्र, निलेश घायवळ पोलिसांच्या हाती लागला नव्हता. आता त्याला कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे.

पुणे! घायवळ टोळीकडून कोयत्याने वार, हल्ल्याचा सूत्रधाराला मुंबईतून केली अटक…

पुणे! गुंड निलेश घायवळ टोळीतील टोळक्याने केले युवकावर सपासप वार…

निलेश घायवळ याच्या भावाला राजस्थानमधून अटक, मंदिरातील प्रसादावर…

कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या थोबाडीत मारणाऱ्या पैलवान सागर मोहोळकरचा मृत्यू…

कुख्यात गुंड निलेश घायवळ याचे लोकेशन सापडलं! लंडनमध्ये नव्हे तर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!