मोबाईल लिंकद्वारे वाहतूकदाराला गंडा; सायबर गुन्हेगाराविरुद्ध गुन्हा दाखल…

पनवेल: कळंबोलीतील एका वाहतूक व्यावसायिकाला, गाडीवर वाहतूक चलन बजावल्याचा बनावट संदेश पाठवून त्यातील लिंकद्वारे मोबाईल हॅक करून त्याच्या बँक खात्यातून ५ लाख २० हजार रुपये लंपास केल्याची घटना समोर आली आहे. तळोजा पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरू केला आहे.

तक्रारदार कासीम कारदअली शेख यांचा तळोजा एमआयडीसीत ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. १९ सप्टेंबरला सायबर भामट्यांनी त्यांच्या गाडीवर वाहतूक पोलिसांनी वाहतूक चलान बजावल्याचे बनावट संदेश पाठवले. गाड्या पार्किंगमध्ये असतानाही चलन कसे काय आले, असा संशय आल्याने त्यांनी संदेशातील लिंक उघडली असता, त्यांना मोबाईल अपडेट करण्यास सांगण्यात आले.

शेख यांनी गुगल पे आणि फोन पे पुन्हा सुरू करताच ओटीपी येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे त्यांनी तातडीने जुने सिमकार्ड बंद करून नवीन सिमकार्ड घेतले. शेख यांनी आपल्या ॲप्सद्वारे खात्याची माहिती तपासली असता, त्यांच्या बँकेच्या खात्यातून एकूण पाच व्यवहारांत ५ लाख २० हजार रुपये डेबिट झाल्याचे निदर्शनास आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!