पुणे पोलिस ॲक्शन मोडमध्ये, डीजे वाजवणाऱ्या मंडळांना धडाधड पाठवल्या नोटीसा…

पुणे: गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिक्षेपकांच्या (साऊंड सिस्टीम) आवाजाची मर्यादा कायम राहावी यासाठी पुणे पोलिसांनी ‘चार बेस, चार टॉप’चा नियम लागू केला होता. मात्र, प्रत्यक्ष विसर्जन मिरवणुकीत अनेक ठिकाणी या नियमांचे उल्लंघन करत आवाजाची मर्यादा ओलांडल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी दोन दिवसांत १,२२४ गणेश मंडळांच्या आवाजाचे ‘रीडिंग’ घेतले असून, आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कडक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पुणे शहरात २५ आणि २६ सप्टेंबर रोजी झालेल्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी १ हजार २२४ मंडळांच्या साऊंड सिस्टीमच्या आवाजाची पातळी (डेसिबल) मोजली होती. या रीडिंगच्या आधारे ज्या मंडळांनी निर्धारित निकषांचे उल्लंघन केले आहे, त्या सर्वांना पुणे पोलिसांकडून ‘शो-कॉज’ (कारण दाखवा) नोटीस बजावण्यात येणार आहे. या नोटीसद्वारे संबंधित गणेश मंडळांकडून नियमांचे उल्लंघन का झाले, याबाबत स्पष्टीकरण मागवले जाईल. मंडळांचे म्हणणे आणि दिलेले स्पष्टीकरण प्राप्त झाल्यानंतरच पोलिस प्रशासनाकडून पुढील कायदेशीर कारवाईचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. पोलिसांच्या या कठोर भूमिकेमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांचे धाबे दणाणले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पुणे शहरात गणपती विसर्जन मिरवणूका सुरू असताना डीजेचा मोठा आवाज सुरू होता. सकाळी 6 वाजेपासून पुण्यात वेगळा डीजेचा दणदणाट सुरु आहे. आवाजामुळे पुणेकर मात्र त्रस्त झाले आहेत. एकीकडे विदयानंद बापट याचं डीजेविरुद्ध आवाज उठवत होते. दरम्यान, पुण्याच्या वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीची सांगता यंदा ३३ तास ३३ मिनिटांनंतर झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही मिरवणूक सुमारे सव्वातास लवकर संपली.

पुणे पोलिस दलातील हवालदाराचा बंदोबस्तादरम्यान हृदयविकाराने मृत्यू…

हृदयद्रावक! पुणे शहरात विसर्जन मिरवणुकीत ट्रॉलीखाली आल्याने हलगी वादकाचा मृत्यू…

पुणे! गणेश विसर्जन मिरवणुकीतील पोलिसांसाठी जनहितम् संघटनेचा सेवाभावी उपक्रम…

पुणे! विद्यानंद बापट यांचा इम्पॅक्ट, 14 डीजे चालकांवर गुन्हे दाखल…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!