
पुणे! कात्रज-कोंढवा रस्त्यावर दगडाने डोक्यात वार करून युवकाचा खून…
पुणे (संदिप कद्रे) : पुणे शहरातील कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरात जेवणाचे पैसे न दिल्याच्या कारणातून झालेल्या वादात तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता ४) दुपारी घडली आहे. या प्रकरणी कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तुषार राजू वाल्हेकर (वय २९, रा. स्वामी समर्थनगर, गोकुळनगर, पुणे) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रोड येथील एका वाईन दुकानासमोरील मोकळ्या जागेत रविवारी दुपारी सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. राजकुमार अंबाजी सनगुडे (वय २५) असे मृत युवकाचे नाव आहे. जेवणाचे पैसे न दिल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. वाद वाढल्यानंतर आरोपीने राजकुमार याच्या डोक्यात दगड घातल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात राजकुमार गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा व पुढील तपासाची कार्यवाही सुरू केली.
View this post on Instagram
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक पोलिस आयुक्त रामदास इंगवले, कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मारुती पाटील, पोलिस निरीक्षक दीपक करांडे, सपोनि रविकांत नेवसे, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत शिरोळे आणि पोलिस उपनिरीक्षक विजय महाडिक यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांनी पुरावे संकलित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
घटनेचे नेमके कारण, आरोपी आणि मयत यांच्यातील संबंध, वाद नेमका कशावरून झाला तसेच हल्ल्यावेळी आणखी कोणी उपस्थित होते का, याबाबत पोलिस तपास सुरू आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि इतर तांत्रिक पुरावे तपासाचा महत्त्वाचा भाग ठरणार आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलिस ठाण्याकडून सुरू आहे.
दरम्यान, कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरात वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या वाईन दुकानासमोरील मोकळ्या जागेत ही घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. किरकोळ कारणातून झालेला वाद एवढा विकोपाला जाऊन तरुणाचा जीव गेल्याने या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन लंडनला पळालेल्या निलेश घायवळ याला क्लिन चीट…
पुणे जिल्हा हादरला! माजी सरपंच महिलेसह दोघींचा मध्यरात्री झोपेतच चिरला गळा…
हृदयद्रावक! पुणे शहरात विसर्जन मिरवणुकीत ट्रॉलीखाली आल्याने हलगी वादकाचा मृत्यू…
पुणे! आयटी इंजिनीअरने पत्नीला संपवलं अन् मारली गॅलरीतून उडी…
पुणे! मैत्रिणीशी बोलल्याच्या रागातून युवकाचं अपहरण; पोलिस अधिकाऱ्याचे 21 कॉल अन् थरारक पाठलाग…

