
ह.भ.प महाराजावर लैंगिक शोषणचा गुन्हा दाखल होताच झाला फरार…
नाशिक: त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखे यांच्यावर इंदिरानगर पोलिस ठाण्यात लैंगिक शोषण, फसवणूक, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होऊनही आरोपीला अटक करण्यात न आल्यामुळे नैराश्यातून पीडित महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला असून, सध्या तिची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, राहुल साळुंखे याने स्वतःच्या पत्नीला घटस्फोट देऊन तुझ्याशी विवाह करतो, असे आमिष दाखवले होते. या लग्नाच्या आमिषापोटी गेल्या तीन वर्षांपासून तो पीडितेचे वारंवार लैंगिक शोषण करत होता. पीडित महिलेने साळुंखेकडे लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा त्याने तिच्याशी विवाह करण्यास स्पष्ट नकार दिला. इतकेच नव्हे तर तिला जबर मारहाण करत तिचे आक्षेपार्ह व खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तिची आणि तिच्या मुलीची हत्या करण्याची धमकीही त्याने दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
View this post on Instagram
या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून नाशिकमधील इंदिरानगर पोलिस ठाण्यात राहुल साळुंखेविरुद्ध लैंगिक अत्याचार, फसवणूक, मारहाण आणि धमकावण्याबाबत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होऊनही पोलिस प्रशासनाकडून आरोपी राहुल साळुंखे याला तातडीने अटक करण्यात आली नाही. आरोपी मोकाट असल्याने आणि पोलिसांच्या या ढिसाळ कारभारावर नाराज होऊन तीव्र नैराश्यातून पीडित महिलेने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेची प्रकृती अजूनही अत्यंत चिंताजनक आहे. आरोपीला तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. इंदिरानगर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
भांडाफोड! अशोक खरात याचे ऑफिसनंतर फार्महाऊसमधील व्हिडीओ SITच्या हाती…
नगर हादरलं! कीर्तनकार महाराजकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; वारकरी संप्रदायला काळिमा…
लातूरमध्ये भोंदूबाबचे कांड; आई-वडीलांना बसवलं घराबाहेर अन् आतमध्ये शारीरिक संबंध…
भोंदू बाबाच्या लॅपटॉपमध्ये महिला अन् विद्यार्थिनींचे अश्लील व्हिडिओ; गुंगीचे औषध आणि छुपे कॅमेरे…
पुणे! भोंदूबाबा अश्लिल व्हिडिओ पाहायचा अन् महिला अनुयायींसमोरच…

