दिल्ली मेट्रोमध्ये जागेवरून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू; माजी आयएएस अधिकाऱ्यासह मुलाला अटक…

नवी दिल्ली: दिल्ली मेट्रो ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव असलेल्या जागेवरून झालेल्या वादात एका ४८ वर्षीय व्यक्तीला थप्पड मारून जोरात ढकलून दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती, पोलिसांनी येथे दिली. या प्रकरणी एक माजी आयएएस अधिकारी आणि त्याच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. ही घटना ८ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालय मेट्रो स्थानकामध्ये घडली होती. मयत पवन शर्मा […]

अधिक वाचा...

बांधकामाचा राडारोडा कुठेही टाकल्यास मुंबई महापालिकेकडून २५ हजार रुपये दंड; वाहनांवर ट्रॅकिंग यंत्रणाही बंधनकारक…

मुंबई: बांधकाम आणि पाडकामाचा राडारोडा कुठेही टाकून, मुंबईतील पर्यावरणाची हानी करणाऱ्या विकसक, कंत्राटदार आणि वाहतूकदारांना यापुढे महागात पडणार आहे. राडारोड्याची अनधिकृत वाहतूक आणि विल्हेवाट रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने कठोर पवित्रा घेतला आहे. आवश्यक नोंदणी न करता किंवा वाहनांवर मागोवा व देखरेख प्रणाली (व्हीटीएमएस) बसवलेली नसल्यास, राडारोड्याची वाहतूक करणाऱ्यांना प्रति वाहन २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार […]

अधिक वाचा...

मोठा ट्विस्ट! मॉडेल श्रद्धा दुबेच्या खोलीत आढळल्या शक्तीवर्धक गोळ्या…

लखनौ (उत्तर प्रदेश): देशभर गाजत असलेल्या रेस्टॉरंट व्यावसायिक शिवा शर्मा हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला असून मुख्य फरार आरोपी मॉडेल श्रद्धा दुबे हिच्याबाबत पोलीस तपासात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. हजरगंज पोलिसांनी जेव्हा श्रद्धा दुबे हिच्या फ्लॅटची झडती घेतली, तेव्हा तिथे काही शक्तिवर्धक औषध साठा आढळून आला आहे. तसेच, घटनेच्या दिवशी त्या फ्लॅटमध्ये श्रद्धा दुबे […]

अधिक वाचा...

मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन…

पुणे: ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधु कांबीकर (वय ७३) यांचे निधन झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या आजाराशी झुंज देत होत्या. पण अखेर आज (सोमवार) त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर मराठी चित्रपटसृष्टीत दु:खाचा डोंगर कोसळला आहे. लावणी, लोकनाट्य, नाटक आणि चित्रपट अशा विविध माध्यमांतून त्यांनी आपल्या कलेची छाप पाडली. ग्रामीण महाराष्ट्रातील लोककलेला व्यापक ओळख […]

अधिक वाचा...

पोलिसांनी वेश्याव्यवसायाचा केला भांडाफोड; हॉटेलमधून अभिनेत्रीची सुटका…

ठाणे: पोलिसांनी ह्युमन ट्रॅफिकिंग आणि सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला असून, या रॅकेटमधून एका कथित टेलिव्हिजन अभिनेत्रीची सुटका करण्यात आली आहे. ही टोळी मनोरंजन क्षेत्रातील महिलांना सेक्स रॅकेटच्या जाळ्यात ढकलत होती. हे प्रकरण उघड होताच, परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असून, एका महिलेला अटक करण्यात आली आहे. ठाण्यात सेक्स रॅकेटचा भंडाफोड झाला […]

अधिक वाचा...

डॉक्टर भूलीचे औषध, सलाईन घेऊन गेला बाथरुममध्ये अन् वाजली मोबाईलची रिंग…

मुंबई : सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरने शनिवारी संध्याकाळी वसतीगृहात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवचरण आप्पा पाटील असे आत्महत्या केलेल्या निवासी डॉक्टरचे नाव आहे. या घटनेमुळे सायन रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. शिवचरण पाटील याने ॲनस्थेशियाचा (Anesthesia drugs) ओव्हरडोस घेऊन आयुष्य संपवल्याची प्राथमिक माहिती आहे. शनिवारी संध्याकाळी सायन […]

अधिक वाचा...

वर्क फ्रॉम होम असलेल्या अविवाहित IT इंजिनियर मुलाने केली आईची हत्या…

अमरावती: एका आयटी इंजिनियर मुलाने स्वतःच्या आईचा गळा आवळून खून केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली असून हत्येनंतर आरोपी मुलगा घरातच थांबला होता. किरकोळ वादातून आई आणि मुलगा तुषार यांच्यात भांडणं झाली होती. रंजना कानफाडे (वय ६०) असे मृत महिलेचं नाव असून तुषार सतीश कानफाडे (वय ३९) असे अटक करण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे. तुषार हा […]

अधिक वाचा...

तुळजापूरला देवीची ज्योत आणायला गेलेल्या तीन युवकांचा अपघाती मृत्यू…

तुळजापूर: तुळजापूर येथून देवीची ज्योत घेऊन आपल्या गावाकडे परतणाऱ्या युवकांवर काळाने घाला घातला आहे. बीड-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव पांढरी (ता. छत्रपती संभाजीनगर) परिसरात शनिवारी रात्री साडे आठच्या सुमारास कंटेनरने युवकांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये तीन युवकांचा मृत्यू तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. खुलताबाद तालुक्यातील गोळेगाव आणि जाफ्राबादवाडी येथील काही तरुण श्रीक्षेत्र तुळजापूर […]

अधिक वाचा...

नाशिकच्या दीपाली पवार मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट…

नाशिक : प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेविका म्हणून काम करणाऱ्या दीपाली पवार यांच्या मृत्यू प्रकरणात पती अनिल सोन्याबापू पवार याच्या पोलिस कोठडीत ११ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. शुक्रवारी न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान दीपालीच्या मोबाईलचा कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) काढल्याची बाब समोर आल्याने या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. हा सीडीआर कोणाच्या आदेशावरुन काढण्यात आला, असा सवाल […]

अधिक वाचा...

कोल्हापूरमध्ये प्रेमाचा भयानक शेवट; तू माझी नाही तर कोणाचीच नाही…

कोल्हापूर: प्रेयसीचा विवाह दुसऱ्याशी ठरल्याच्या संतापातून एकाने अपहरण करून तिला थेट दरीत ढकलून दिल्याची संतापजनक घटना भुदरगड तालुक्यातील शिवडाव नाईकवाडी परिसरात घडली आहे. यामध्ये युवतीचा जागीच मृत्यू झाला आहे. तरुणी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी श्रीपाद वडर याला अटक केली आहे. तरन्नूम बशीर नाईक (वय २३, मूळ रा. पाटगाव, […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!