हृदयद्रावक! आळंदीवरून सहलीला गेलेले ८ विद्यार्थी दिवेआगर बीचवर बुडाले, पाहा नावे…

रायगड : दिवेआगर येथे सहलीसाठी आलेल्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मृत विद्यार्थ्यांना समुद्राबाहेर काढण्यात आले असून, हे सगळे विद्यार्थी आळंदी (जि. पुणे) येथील एका खासगी क्लासमध्ये शिकत होते. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

आळंदी येथील विनर्स अकादमीमध्ये शिक्षण घेत असलेल्या ४२ विद्यार्थ्यांचा समूह रायगडमधल्या दिवेआगर बीचवर सहलीसाठी आला होता. या समूहात २५ मुलं, १७ मुली आणि २ शिक्षण असे एकूण ४४ जण होते. आज (गुरुवार) संध्याकाळी चार वाजता शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा समूह दिवेआगरला दाखल झाला होता. तिथे फेसाळणाऱ्या लाटांचा आनंद घेण्यासाठी काही विद्यार्थी समुद्रात उतरले. त्यावेळी पाण्याचा वेग प्रचंड होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पाण्याचा अंदाज न आल्याने जवळपास आठ विद्यार्थ्यांचा बुडून धक्कादायक मृत्यू झाला. विद्यार्थी बुडत असलेले पाहून शिक्षकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. स्थानिकांनी देखील बचाव कार्यासाठी झोकून दिले. परंतु विद्यार्थ्यांना वाचविण्यात त्यांना यश आले नाही. आपत्ती व्यवस्थापनाकडून तातडीने रेस्क्यू ऑपरेशन राबवले गेले. आठही विद्यार्थ्यांना समुद्रातून बाहेर काढण्यात आले आहे.

मृत विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे…
१) तन्मय दत्तात्रय वहीले
२) सुमित भरत अहिरे
३) प्रणव रामदास बनसोडे
४) कैवल्य सतीश वासनकर
५) राजवीर युवराज वहीले
६) यश किरण वानखेडे
७) सोहम तुकाराम भांडवलकर
८) कौस्तुभ संदीप दौंड
सगळीच मृत मुले १६ वर्षांची, सगळेच आळंदीचे राहणारे आहेत. दरम्यान, सर्व विद्यार्थी इयत्ता अकरावीत शिकत होते. आळंदीच्या विनर्स अकादमी येथे रसायनशास्त्र विषय शिकण्यासाठी सर्व विद्यार्थी येत असत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

गुहागरच्या समुद्रात कुटुंबातील तिघे बुडाले; एकाचा मृत्यू…

हृदयद्रावक! नाशिकचे कुटुंब उपचारासाठी मुंबईला अन् समुद्रात बुडाले…

खांबोली तलावात फर्ग्युसन महाविद्यालयाचे दोन विद्यार्थी बुडाले

उजनी धरणात बोट उलटल्याने पाच जण बुडाले…

हृदयद्रावक! आईसोबत कपडे धुण्यासाठी गेले अन् कुटुंबातील तिंघाचा झाला मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!