
पोलिसांनी वेश्याव्यवसायाचा केला भांडाफोड; हॉटेलमधून अभिनेत्रीची सुटका…
ठाणे: पोलिसांनी ह्युमन ट्रॅफिकिंग आणि सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला असून, या रॅकेटमधून एका कथित टेलिव्हिजन अभिनेत्रीची सुटका करण्यात आली आहे. ही टोळी मनोरंजन क्षेत्रातील महिलांना सेक्स रॅकेटच्या जाळ्यात ढकलत होती. हे प्रकरण उघड होताच, परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असून, एका महिलेला अटक करण्यात आली आहे.
ठाण्यात सेक्स रॅकेटचा भंडाफोड झाला असल्याची माहिती समोर येताच परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. तर, तिच्या इतर पुरुष साथीदाराचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. एका NGOकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी 8 ऑक्टोबर रोजी मीरा – भायंदर रोड परिसरातील संबंधित हॉटेलवर नकली ग्राहक पाठवले. यानंतर पोलिसांनी सापळा रचून या टोळीवर छापा टाकला. या प्रकरणी एका महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. माहितीनुसार, ही महिला कथितरित्या महिलांना देहविक्री करण्यास भाग पाडत होती. ती त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचा आरोप आहे.
View this post on Instagram
पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणातून टिव्ही आणि वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीची सुटका करण्यात आली आहे. सध्या ती मुंबईतील रेस्क्यू फाऊंडेशनच्या संरक्षणाखाली आहे. या रॅकेटच्या टोळीनं विशेषत: एन्टरटेंनमेंट इंडस्ट्रीतील महिलांना टार्गेट केले होते. जे टेलिव्हिजन मालिका, वेब सिरीज आणि फोटोशूट करतात. अटक करण्यात आलेल्या महिलेविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 143 (ह्यूमन ट्रॅफिकिंग) आणि अनैतिक व्यापार अधिनियम कायद्याच्या तरतुदींनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
मुंबईच्या आलिशान हॉटेलात वेश्याव्यवसाय, पोलिसांकडून दोन अभिनेत्रींची सुटका…
मुंबईत मराठी अभिनेत्री अडकली सेक्स रॅकेटमध्ये; एका रात्रीसाठी मिळायचे…
उल्लूची अभिनेत्री चालवायची सेक्स रॅकेट; पोलिसांनी पकडले रंगेहात…
पुणे शहरात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, अभिनेत्रीसह दोन मॉडेल…
अभिनेता आमिर खानच्या एक्स पत्नीचे शारीरिक संबंधाबाबत बोल्ड वक्तव्य…

