
पुणे! कोंढवा पोलिसांनी ४३,०४,०६० रूपये फिर्यादीस दिले परत मिळवून…
पुणे (संदिप कद्रे): शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाच्या नावाखाली वेगवेगळे टास्क देवून आर्थिक फसवणूकीच्या गुन्हयामध्ये कोंढवा पोलिसांनी ४३,०४,०६० रूपये रक्कम फिर्यादीस परत मिळवून दिले आहेत. तक्रारदार यांनी गुन्हयाचे तपासाबाबत समाधान व्यक्त करून कोंढवा पोलिस स्टेशनचे आभार मानले आहेत.
इंटरनेटच्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञान व उपकरणे वापरुन गुन्हा करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या सर्व वयोगटातील व्यक्ती सोशल मिडीया (व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, व्टिटर इ.) अनेक मोबाईल अॅप व ऑनलाईन गेम यावर त्यांचा बहुमुल्य वेळ घालवत आहेत. त्यावरुन नागरिकांची मोठ्या प्रमाणात सायबर फसवणूक होत आहे. तक्रारदार आयुब मकबुल सय्यद (वय ६३ वर्षे, रा. एन. आय.बी.एम, कोंढवा, पुणे) यांनी नॅशनल सायबर ऑनलाईन पोर्टलवर दिलेली तक्रार कार्यवाहीकरिता कोंढवा पोलिस स्टेशन, पुणे येथील सायबर विभागास प्राप्त झाली होती. त्यामध्ये तक्रारदार यांनी त्यांची शेअर ट्रेडींग करण्याच्या नावाखाली वेगवेगळे टास्क करण्यास सांगून, त्यांना चांगला लाभ मिळेल असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांची एकूण रु.४६,७५,०००/- रक्कम रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली अशी तक्रार दिली होती. त्यावरून कोंढवा पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नं ११७४ / २०२४ भारतीय न्याय संहिता – २०२३ चे कलम ३१८(४), ३१९(२), ३(५), सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (ड) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
दाखल गुन्हयाचे तपासामध्ये तक्रारदार यांची फसवणूक झालेली एकूण रु. ४६,७५,०००/- रक्कम वेगवेगळया खात्यावर पाठविल्याचे दिसून आले. सायबर विभागाचे सहा. पोलिस निरीक्षक मोहसिन पठाण पोहवा ३४०९ राहूल शितोळे व मपोशि ७९४६ अश्विनी सावंत यांनी तक्रारदार यांचेशी समन्वय ठेवून गुन्हयाचे तपासामध्ये तक्रारदार यांचे खात्यावरून झालेल्या ट्रान्झेक्शन बाबत माहिती घेवून संबंधित बँक / मर्चंट यांना संपर्क केला व फसवणूक झालेल्या रक्कमेतील ४३,०४,०६०/- रूपये रक्कम गोठवून न्यायालयाचे आदेशानुसार तक्रारदार यांचे खात्यावर परत मिळवून देण्यात कोंढवा पोलिस स्टेशनचे सायबर विभागास यश मिळाले आहे. तक्रारदार यांनी गुन्हयाचे तपासाबाबत समाधान व्यक्त करून कोंढवा पोलिस स्टेशनचे आभार मानले आहेत.
सदरची कार्यवाही पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त, रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ – ५, डॉ. राजकुमार शिंदे, सहा. पोलिस आयुक्त, वानवडी विभाग, धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विनय पाटणकर पोलिस निरीक्षक (गुन्हे) अब्दुल रऊफ शेख यांचे मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलिस स्टेशन येथील सायबर विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मोहसीन पठाण, मयुर वैरागकर, पोलिस हवालदार राहूल शितोळे, अरुण किटे, लवेश शिंदे व महिला पोलिस अंमलदार अश्विनी सावंत यांनी केली आहे.
एटीएम कार्ड बदलून खात्यातून पैसे काढणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील दोघांना अटक…
ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश…
डिजिटल अरेस्टसाठी तोतया पोलिस अधिकाऱ्याचा VIDEO कॉल अन् युवकाची शक्कल…
धडाकेबाज कारवाई! पुणे पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या टोळीतील महिलेला बिहारमधून केली अटक…
Cyber Crime! पोलिसकाकाच्या खात्यातून 2.3 लाख गायब; कसे गेले पाहा…
नवरदेवाने इन्स्टन्ट लोन कंपनीकडून पैसे घेतले पण एजंट्सनी पत्नीचे फोटो केले मॉर्फ अन्…
Cyber Crime! युवतीला विवस्त्र होण्यास सांगून केलं चित्रीकरण अन्…
एकाला तब्बल ८४ लाख ३४ हजार रुपयांचा एकाला ऑनलाईन गंडा; कसा पाहा…
पुण्यातील IT इंजिनिअरकडून उकळले तब्बल सहा कोटी उकळले…
Cyber Crime! Whatsapp वर लग्नाचं निमंत्रण आलं तर सावधान…
Youtube वर Video Like करायला सांगितलं अन् गमावले 56 लाख…
पिंपरी-चिंचवडमधील युवतीची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक अन् पोलिसांकडून…
आयटी युवतीची लाखो रुपयांची ऑनलाइन फसवणूक; पण परत मिळाले पैसे…
युवतीला व्हिडिओ कॉल केला आणि केली लाखो रुपयांची फसवणूक…
सायबर गुन्हेगारांची हिंमत! पुणे पोलिसांचा फोटो वापरून पैसे उकळण्याचा प्रयत्न…
महिलेला फोन आला आणि क्षणात लाखो रुपये गायब; कसे पाहा…

