शिक्षकाने बॅड टच करत तुला पीटी क्लास कसा वाटला? असे विचारले अन्…

पुणे: विद्येच्या माहेरघरात शिक्षकी पेक्षाला काळीमा फासणारी घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पुणे शहरातील लोहगाव परिसरात असलेल्या केंद्रीय विद्यालयात शिक्षकानेच शाळेतील दोन विद्यार्थ्याींनीसोबत अश्लील चाळे करत विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर संबंधित शिक्षकाविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोहगाव येथे केंद्रीय विद्यालय आहे. आरोपी शिक्षक हा या शाळेत शारीरिक शिक्षणाचे शिक्षक आहे. फिर्यादी यांची 10 वर्षांची मुलगी शाळेत असताना दोन आठवड्यांपूर्वी आरोपी शिक्षकाने मैदानावर वाईट उद्देशाने तिच्या अंगाला स्पर्श केला. आणखी एका विद्यार्थिनीला बॅड टच करत तुला पीटी क्लास कसा वाटला? असे विचारून अश्लील कृत्ये केले.

दरम्यान, या मुलींनी घरी गेल्यानंतर आईला संपूर्ण हा प्रकार सांगितला. त्यानंतर आईने विमानतळ पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. विमानतळ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.

धक्कादायक! अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून बलात्कार…

विद्येच्या माहेरघरात युवतीला हॉटेलमध्ये नेऊन केला अत्याचार…

अल्पवयीन मुलीवर एकाच दिवसात दोन वेळा अत्याचार…

पुणे जिल्हा हादरला! पित्याचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार…

नवऱ्याच्या दोन मित्रांनी महिलेच्या इच्छेविरुद्ध ठेवले अनैसर्गिक शरीरसंबंध…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!