
Video : विराट कोहली थेट महिला पत्रकारासोबत भिडला…
ब्रिसबेन (ऑस्ट्रेलिया) : भारताचा क्रिकेटपटून विराट कोहली हा ब्रिसबेनमध्ये एका महिला रिपोर्टरवर चांगलाच भडकला आहे. संबंधित व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना संपल्यानंतर विराट कोहली ब्रिसबेनच्या विमानतळाहून होता. यावेळी माध्यमाच्या प्रतिनिधींनी विराट कोहलीचे फोटो घ्यायला सुरूवात केली. यावेळी विराट कोहलीसोबत त्याची मुलं होती. मुलांचे फोटो घेत असल्याचे विराट कोहलीला आवडले नाही. याच कारणामुळे तो भडकला. तुम्ही माझ्या कुटुंबीयांची प्रायव्हसी अशा प्रकारे भंग करू शकत नाही, असे विराट कोहली माध्यम प्रतिनिधीला बोलताना दिसत आहे.
Indian cricket superstar Virat Kohli has been involved in a fiery confrontation at Melbourne Airport. @theodrop has the details. https://t.co/5zYfOfGqUb #AUSvIND #7NEWS pic.twitter.com/uXqGzmMAJi
— 7NEWS Melbourne (@7NewsMelbourne) December 19, 2024
दरम्यान, विराट कोहली भडकल्यामुळे माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आम्ही तुमची प्रायव्हसी अबाधित राखू. तुमच्या कुटुंबाचे फोटो घेणार नाही, असे आश्वासन दिल्यानंतर विराट कोहलीने रिपोर्टशी हात मिळवला आणि तेथून निघून गेला. दरम्यान, विराट भडकल्याचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
Shame on Australian media. Virat Kohli is with his family and you have to respect his privacy. You cannot film him without his permission. Stay strong @imVkohli. You are a legend and always have my support 🇮🇳❤️❤️❤️
— Farid Khan (@_FaridKhan) December 19, 2024

