Video: चिनी-पाकिस्तानी युवतीची भररस्त्यात हाणामारी…

कराची (पाकिस्तान) : चिनी आणि पाकिस्तानी युवतीची भररस्त्यात हाणामारी झाली. चिनी युवतीने पाकिस्तानी युवतीची चांगलीच धुलाई केली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक चिनी महिला पाकिस्तानच्या रस्त्यावर एका पाकिस्तानी युवतीचे केस धरून तिला ओढताना दिसत आहे. रस्त्यावर उपस्थित असलेले नागरिक भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, चिनी युवती ऐकायला तयार नाही. तिने पाकिस्तानी युवतीला बेदम मारहाण केली आहे. भांडणाचे कारण समजू शकलेले नाही.

संबंधित व्हिडिओ घर के कलेश नावाच्या अकाऊंटवरून ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे. एका नेटिझन्सने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ‘तुम्ही चीनचे पैसे खाल्ले तर तुम्हाला कॉम्पलिमेंट म्हणून लाथ घ्यावी लागेल.’ दुसऱ्या एकाने म्हटले आहे की, ‘पाकिस्तानी मार खाण्यासाठीच जन्माला येतात.’

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!