Video: चिमुकलीच्या अंगावरून तीन वाहनं गेली अन्…

लंडन : एका चिमुकली पालकांची नजर चुकवून रस्त्यावर गेल्यानंतर तीन वाहनांनी तिला धडक दिली. पण, देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा येथे प्रत्येय आला असून, चिमुकली बचावली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

@earth.reel या Instagram अकाऊंटवर अनेकदा आश्चर्यकारक व्हिडिओ पोस्ट केले जातात. नुकताच असाच एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक चिमुकली धावत धावत रस्त्यावर पोहोचते आणि इथे तिचा अतिशय भीषण अपघात होतो. पण तिचं नशीब बलवत्तर की तीन वाहनं अंगावरून जाऊनही तिला काहीच होत नाही आणि ती वाचली आहे.

चिमुकली रस्त्याच्या दिशेने पळताना दिसत आहे. भरधाव वेगाने येणारी दुचाकी तिच्या अंगावरुन गेली, त्यामुळे ती खाली पडली. त्यानंतर दुसरी दुचाकी आणि तिसरी दुचाकीही तिच्या अंगावरुन गेली. तेवढ्यात तिची आई धावत येते आणि तिला आपल्या मिठीत घेते. क्षणभर असं वाटतं की मुलीचा यात मृत्यू झाला आहे, पण ती हालचाल करू लागते आणि आई रडत रडत तिला आपल्या जवळ घेते .

दरम्यान, संबंधित व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. शिवाय, अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटलं, खरं तर, दुचाकीने तिला एका मोठ्या ट्रकपासून वाचवले आहे. एकाने म्हटलं, की पालकांनी मुलीची चांगली काळजी घेतली नाही, त्यामुळे त्यांना तुरुंगात पाठवा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Earth Reels (@earth.reel)

Video: पत्नीला धक्का लागला म्हणून मारहाण; युवक रुळावर पडला अन् क्षणात…

Video: मुंबईतील महिलेचे श्वानासोबत धक्कादायक कृत्य…

कौतुकाचा वर्षाव! जवानाचा Video पाहून पाणावतील डोळे…

धक्कादायक Video! चिमुकलीला खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या बापावर झाडल्या गोळ्या…

संतापजनक Video! पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले अन् पुढे…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!