लंडनमध्ये भारतीय युवतीची चाकूने भोसकून हत्या…
लंडन: वेम्बली येथील नील क्रिसेंटमध्ये कोंथम तेजस्विनी (वय २७, रा. हैदराबाद) या युवतीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
आरोपींनी आणखी एका २८ वर्षीय महिलेवरही चाकूने हल्ला केला आहे. या महिलेला गंभीर दुखापत झाली असून, उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लंडन मेट्रोपॉलिटन पोलिसांनी ही घटना १३ जून रोजी घडल्याचे सांगितले आहे.
लंडन रुग्णवाहिका सेवेला सकाळी ९.५९ वाजता दोन महिलांवर चाकूने हल्ला झाल्याचा फोन आला. घटनास्थळी गेल्यानंतर दोघीजणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी तेजस्विनीचा जागीच मृत्यू झाल्याचे आढळून आले. दुसरी महिला श्वास घेत होती. यावरून पोलिसांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, हल्ला करण्यामागचे कारण शोधत आहेत.