
निलेश घायवळ गँगच्या सदस्याला अटक; धक्कादायक माहिती समोर…
पुणे: गॅंगस्टर निलेश घायवळ टोळीचा सक्रीय सदस्य असलेल्या अजय सरोदे याच्या घरी तब्बल 400 काडतूस सापडली आहेत. 200 जिवंत काडतूस आहेत तर 200 रिकाम्या पुंगळ्या सापडल्या आहेत. अजय सरोदे आणि बटर्या चौधरी या दोघांना कोथरूड पोलिसांनी गाणगापूर, कर्नाटक येथून तीन दिवसांपूर्वी अटक केली आहे.
कोथरूड भागात 17 सप्टेंबरला घायवळ टोळीने एकावर गोळीबार केला होता त्यावेळी अजय सरोदे घटनास्थळी उपस्थित होता. त्यामुळे त्या गुन्ह्यात अजय सरोदे हा ही आरोपी होता. अजय सरोदे याच्याकडे पिस्तुल परवाना असल्याचे समोर आले आहे. त्याला 29 जानेवारी 2024 ला पोलिसांनी पिस्तुली परवाना दिल्याची माहिती समोर आली आहे.

निलेश घायवळ याने दहशत निर्माण करून बेकायदेशीररीत्या जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार केले आहेत. तसेच खंडणी उकळणं आणि संशयास्पद आर्थिक व्यवहार केल्याचाही संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या सर्व घडामोडींचा सखोल तपास होऊन गैरव्यवहार उघडकीस यावेत, यासाठी पुणे पोलिसांनी ईडीला पत्र पाठवले आहे. यासोबतच निलेश घायवळ याच्यावर 45 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात पुणे पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.
निलेश घायवळ याची ‘8055 BOSS’ अशी नंबर प्लेट असलेली गाडी जप्त…
कुख्यात गुंड निलेश घायवळ याला अखेर मोठा दणका…
पुणे पोलिसांची निलेश घायवळच्या गँगवर आणखी मोठी कारवाई…
निलेश घायवळसह बंधुंचा आणखी एक कारनामा समोर…
गुंड निलेश घायवळ याच्या घरावर पोलिसांची धाड; काय-काय सापडलं पाहा…

