पुण्यात ‘एनआयए’कडून आणखी एका दहशतवाद्याला अटक…

पुणे: एनआयएकडून आणखी एका दहशतवाद्याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. पुणे ISIS मॉड्युल प्रकरणात ही आठवी अटक आहे. दहशतवाद्यांना अटक करून ‘इस्लामिक स्टेट’चे (आयएस) महाराष्ट्र मॉड्यूल उद्ध्वस्त करण्यात यश मिळाले आहे.

महंमद शाहनवाज आलम (वय 31, मूळ झारखंड) असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे पुणे ISIS मॉड्युल प्रकरणात सध्या अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींशी शाहनवाज आलमचा थेट संबंध होता. लपण्याचे ठिकाण शोधणे, शस्त्र चालवण्याचे आणि स्फोटकांचे सराव वर्ग आयोजित करण्यात आलमचा सहभाग होता. जुलै महिन्यात कोथरूड येथे दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली तेव्हा आलम पसार झाला होता.

दरम्यान, पुणे पोलिसांनी मो. इम्रान खान आणि मो. युनूस साकी यांच्यासह दुचाकी चोरीचा प्रयत्न करताना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर ते आयएसआयएसचे सक्रिय कार्यकर्ते असल्याचे समोर आले. पुढे एनआयएने त्यांच्यावर दहा लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. शाहनवाज आलमला पकडण्यासाठी तीन लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. ISIS मॉड्युलप्रकरणी NIA ने केलेल्या तपासात समोर आले आहे की, आरोपी व्यक्तींनी ISIS अजेंडा पुढे नेण्यासाठी देशातील शांतता आणि जातीय सलोखा बिघडविण्याच्या उद्देशाने दहशतवादी कृत्ये करण्याची योजना आखली होती. दहशतवाद्यांनी पुण्यासह काही शहरांमध्ये घातपाताचा कट आखला होता.

ISIS, ज्याला इस्लामिक स्टेट (IS), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेव्हंट (ISIL), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS), Daish, इस्लामिक स्टेट इन खोरासान प्रांत (ISKP), ISIS विलायत खोरासान, आणि इस्लामिक स्टेट म्हणूनही ओळखले जाते. इराक आणि शाम खोरासान (ISIS-K), सक्रियपणे भारतविरोधी अजेंडा राबवत आहे आणि हिंसक कृत्यांच्या मालिकेद्वारे देशभरात दहशत आणि हिंसाचार पसरवत आहे.

पुणे दहशतवादी अटक प्रकरणात मोठी घडामोड; वाहनात आढळला शस्त्रसाठा…

पुणे दहशतवादी प्रकरण : भूलतज्ञ डॉक्टर युवकांना ओढायचा ISISच्या जाळ्यात अन्…

पुणे शहरात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे, दोघांना अटक…

दहशतवाद्यांच्या घरात सापडली बॉम्ब बनविण्याबाबतची चिठ्ठी…

पुण्यातील संशयित दहशवादी प्रकरणात आणखी एक ताब्यात; युवती रडारवर…

पुण्यात स्फोट करण्याचा कट; तिसऱ्या आरोपीला गोंदियातून अटक…

पुण्यात सापडलेल्या दहशतवाद्यांबाबत एटीएसची धक्कादायक माहिती…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!