पाकिस्तानमध्ये मुख्याध्यापकाचा तब्बल 45 महिलांवर बलात्कार…
कराची (पाकिस्तान): एका शाळेच्या मुख्याध्यापकाने तब्बल 45 महिलांवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात आरोपी मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
आरोपी मुख्याध्यापकाचे नाव इरफान गफूर मेमन आहे. आरोपीच्या मोबाईलमध्ये अनेक महिलांचे व्हिडिओ आणि फोटोज सुद्धा आढळून आले आहेत. आरोपीला सोमवारी अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे.
आरोपी मुख्याध्यापक हा महिलांवर बलात्कार करत असे आणि या घटनेचे व्हिडिओ त्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर रेकॉर्ड करुन त्याद्वारे या महिलांना ब्लॅकमेल करत असे. हे सर्व फूटेज त्याच्या मोबाईल फोनमध्ये आढळून आले आहेत. पोलिसांनी सांगितले की, ‘महिलांवर बलात्कार केल्यावर सीसीटीव्ही फूटेजच्या सहाय्याने आरोपी महिलांना ब्लॅकमेल करत होता. आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून, त्याला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.’
Video: पाकिस्तानमधील गरिबी; गाढवाला काय करावं लागतंय पाहा…
Video: पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिचा नवीन व्हिडिओ समोर…
भारतात जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या दहशतवाद्याची पत्नी पाकमध्ये बनली मंत्री…
Video: पाकिस्तानात गेलेली भारतीय अंजू झाली फातिमा…
Video: पाकिस्तानात गेलेली भारतीय अंजू झाली फातिमा…