प्रसिद्ध निर्मात्याला अटक, दुसऱ्या लग्नमुळे झाला होता ट्रोल…

मुंबई : प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक रविंदर चंद्रशेखरन (वय ३९) यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. रविंदर चंद्रशेखरन दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आले होते. शिवाय, त्यांना ट्रोलही करण्यात आले होते. रविंदर चंद्रशेखरन यांना सेंट्रल क्राईम ब्रांचने (CCB) १६ कोटी रुपयांच्या फसवणुकी प्रकरणी अटक केली आहे. त्यांच्या विरोधात चेन्नई येथील पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ऑक्टोबर २०२० मध्ये लिब्रा प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या रविंदर चंद्रशेखरन याने ‘मादव मीडिया प्रायव्हेट लिमिटेड’च्या बालाजी कापा यांच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला होता. संबंधीत प्रस्ताव नगर पालिकेच्या घनकचऱ्याचे ऊर्जेत रूपांतर करायचा होता. यासाठी रविंदर चंद्रशेखरन याने बालाजी कापाकडून आर्थिक मदत घेतली होती. १७ सप्टेंबर २०२० मध्ये एक गुंतवणूक करार केला आणि रविंदर चंद्रशेखरन याला १५.८३ कोटी रुपये देण्यात आले होते. पण व्यवसाय सुरु केल्यानंतर रविंदर चंद्रशेखरन यांनी बालाजी कापा कंपनीचे पैसे परत केले नाहीत. रविंदर चंद्रशेखरन याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. सध्या याप्रकरणी पोलीस अधिक करत आहेत.

रविंदर चंद्रशेखरन याने अभिनेत्री महालक्ष्मी शंकर हिच्यासोबत दुसरे लग्न केले आहे. पहिलं लग्न आर. शांती हिच्यासोबत झाले होते. पण दोघांचे लग्न अधिक काळ टिकले नाही. अखेर निर्मात्याने महालक्ष्मी शंकर हिच्यासोबत दुसरे लग्न केले आहे. महालक्ष्मी आणि रविंद्र ओळख यांची ओळख ‘विदियुम वरई काथिरु’ या चित्रपटादरम्यान झाली. चित्रपटाच्या सेटवरच दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्रीने फक्त पैशांसाठी निर्मात्यासोबत लग्न केले, अशी देखील चर्चा रंगली होती.

स्टाइलिश है डायरेक्टर की दूसरी पत्नी, खूबसूरती देख उड़े होश - Actress vj  mahalakshmi producer ravindar chandrasekaran stylish glamorous dress salwar  suit saari wedding photo viral tvism

प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन…

अभिनेत्री अंकिता लोखंडे हिला पितृशोक…

सीमा-सचिनच्या लव्हस्टोरीवर येणार ‘कराची-टू-नोएडा’ चित्रपट…

प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक अवस्थेत आढळला मृतदेह…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!