भारतात जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या दहशतवाद्याची पत्नी पाकमध्ये बनली मंत्री…

इस्लामाबाद : भारतीय तुरुंगात बंद असलेल्या दहशतवाद्याची पत्नी पाकिस्तानात मंत्री बनली आहे. मुशाल मलिक असे मंत्री बनलेल्या महिलेचे नाव आहे. पाकिस्तानातील काळजीवाहू पंतप्रधान अनवर उल हक यांच्या कॅबिनेटमध्ये स्थान मिळाले आहे. मुशाल मलिकने गुरुवारी संध्याकाळी मंत्रिपदाची शपथ घेतली.

मुशाल मलिक शिवाय जलील अब्बास जिलानी परराष्ट्र मंत्री, सरफराज बुग्ती गृह मंत्री, डॉ श्मशाद अख्तर वित्त मंत्री, जनरल (रि) अनवर अहमद यांना संरक्षण मंत्री बनण्यात आले आहे. कार्यवाहक पीएम अनवर उल हक यांच्या कॅबिनेटचा काल शपथविधी झाला. मुशाल मलिकचा नवरा भारतीय तुरुंगात बंद आहे. जम्मू-काश्मीरमधील फुटीरतवादी नेता आणि टेरर फंडिंग प्रकरणात यासीन मलिक अटकेत आहे.

मुशाल मलिक आणि यासीन मलिक यांचा 22 फेब्रुवारी 2009 रोजी रावळपिंडीमध्ये निकाह झाला. 2005 मध्ये यासीन मलिक पाकिस्तानात गेला होता. त्यावेळी त्याची मुशाल बरोबर ओळख झाली. मुशालने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून ग्रॅज्युएशन केले आहे. मुशालची आई रेहाना मलिक पाकिस्तान मुस्लिम लीग या नवाज शरीफ यांच्या पक्षाच्या महिला आघाडीची सचिव होती. तिचे वडिल अर्थशास्त्र तज्ज्ञ आहेत. मुशालचा भाऊ परराष्ट्र विषयांचा जाणकार आहे. मुशाल इस्लाबाद येथे आपल्या बहिणीसोबत राहते.

दरम्यान, यासीन मलिक 2019 पासून भारताच्या तुरुंगात बंद आहे. 2017 साली टेरर फंडिंग प्रकरणात त्याला अटक झाली होती. NIA ने यासीन विरोधात गुन्हा दाखल केला. मागच्यावर्षी मे महिन्यात दिल्लीतील एक न्यायालयाने यासीनला दोषी ठरवले. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर हिने गरोदरपणाबाबत केला खुलासा…

पुणे शहरात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे, दोघांना अटक…

पाकिस्तानमध्ये जमियत उलेमाच्या रॅलीत बॉम्बस्फोट; ३५ ठार…

Video: अंजूने पाकिस्तानातून अरविंदला फोन करून केली शिवीगाळ…

पाकिस्तानने अभिनंदन यांना दिलेल्या चहाचं बिल केले व्हायरल…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!