Video: पाकिस्तानात गेलेली भारतीय अंजू झाली फातिमा…

नवी दिल्ली: राजस्थानातून पाकिस्तानात गेलेली अंजू या भारतीय महिलेने इस्लाम धर्म स्विकारत पाकिस्तानी प्रियकरासोबत लग्न केल आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अंजू हिने आपण प्रियकराला फक्त भेटायला आलो आहोत आणि नंतर भारतात परतणार असल्याचे सांगितले होते. पण, अंजूने पाकिस्तानात जाऊन इस्लाम धर्म स्वीकारला असून नसरूल्लाहसोबत निकाह केला आहे. तिने स्वतःचं नाव आता फातिमा असे ठेवलं आहे. खैबर पख्तनुख्वा या ठिकाणी या दोघांनी निकाह केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत अंजू आपल्या प्रियकर नसरुल्लाहसोबत फिरताना दिसत आहे. शिवाय, दोघं एकमेकांच्या हातात हात घालून फिरत आहेत. हा व्हिडीओ पाहून प्री वेडिंग शूट असल्याचा अंदाज बांधला जात आहे.

दरम्यान, पाकिस्तानमधून भारतात आलेली सीमा हैदर प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असतानाच आता भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूचे प्रकरणही चांगलेच चर्चेत आले आहे. आपल्या फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी अंजू पाकिस्तानात गेली. अंजूने इस्लाम धर्म स्वीकारला नसरुल्लाहशी लग्नही केले आहे. सध्या मीडियामध्ये तिचा आणि नसरुल्लाहचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. अंजूचे आधीच भारतात लग्न झाले असून तिला दोन मुलेही आहेत. अंजू ख्रिश्चन धर्मातून इस्लाम धर्मात गेली असून, आता तिने आपले नावही फातिमा ठेवल्याची माहिती मीडियातून समोर येत आहे.

खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, अंजू नसरुल्लासोबत राहत आहे अंजूने पोलिसांना सांगितले की, तिने तिच्या पतीला भारतात घटस्फोट दिला आहे. अंजूच्या पाकिस्तानात येण्याचा तपास पूर्ण झाला आहे. ती एका महिन्याच्या व्हिजिट व्हिसावर पाकिस्तानात आली आहे आणि तिची सर्व कागदपत्रे वैध आणि योग्य आहेत.

अंजू उत्तर प्रदेशच्या कलोरची रहिवासी आहे. ती एका खाजगी कंपनीत काम करते आणि 2007 मध्ये तिचे लग्न अरविंदसोबत झाले होते. लग्नानंतर अंजू पतीसोबत राजस्थानमधील भिवडी येथे राहायला आली. लग्नानंतर तिला अरविंदपासून दोन मुलेही आहेत. अंजू फेसबुकच्या माध्यमातून नसरुल्लाच्या संपर्कात आली आणि त्यानंतर त्यांची मैत्री झाली. यानंतर दोघेही फोनवर बोलू लागले आणि त्याला भेटण्यासाठी पाकिस्तानात पोहोचली असून, लग्नही केले असल्याची माहिती पुढे आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!