मोठी दुर्घटना! नेपाळमध्ये प्रवाशांनी भरलेल्या दोन बस नदीत कोसळल्या…
काठमांडू (नेपाळ) : नेपाळमध्ये दरड कोसळली आणि प्रवाशांनी भरलेल्या दोन बस नदीत कोसळल्या आहेत. याची माहिती मिळताच अधिकारी आणि बचावकार्यासाठी जवान पोहोचले आहेत. त्रिशूली नदीत दोन बस वाहून गेल्या. या दोन बसमध्ये प्रवास करणारे 63 जण बेपत्ता आहेत. मृतांमध्ये 7 भारतीयांचा समावेश आहे. सध्या रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली असून शोधकार्य आणि बचावकार्य सुरू आहे. कर्मचाऱ्यांनी […]
अधिक वाचा...Video: राष्ट्रीय खेळाडूने धबधब्यात मारली उडी अन् गमावला जीव…
पुणे : ताम्हिणी घाटात एक युवकाने धबधब्यात उडी मारली आणि वाहून गेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. स्वप्नील धावडे असे या युवकाचे नाव असून, तो राष्ट्रीय खेळाडू होता. स्वप्निल हा आपल्या जिममधील 32 जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी गेला असताना घटना घडली आहे. स्वप्नील धावडे हे बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय खेळाडू राहिले होते. त्याच आधारे ते […]
अधिक वाचा...Video: …तर लोणावळा येथे अन्सारी कुटुंब बचावले असते
पुणे : पुणे शहरातील हडपसर भागातील अन्सारी कुटुंब लोणावळ्याला रविवारी (ता. ३०) फिरण्यासाठी गेले होते. भुशी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पावसाचा आनंद घेत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला अन् त्यामध्ये 9 जण अडकले. त्यातील चार जणांना वाचवण्यात यश आले. मात्र एक महिला आणि चार मुले वाहून गेले. या घटनेमुळे अन्सारी कुटुंबावर दुखाःचा डोंगर कोसळला आहे. पुण्यातील […]
अधिक वाचा...Video: लग्नसमारंभासाठी आलेले अन्सारी कुटुंब लोणावळा येथे गेले अन्…
पुणे : लोणावळा येथील भुशी डॅम परिसरात वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉल येथून हे अन्सारी कुटुंब वाहून गेले आहे. वाहून गेलेल्या पाच जणांपैकी चौघांचे मृतदेह सापडले आहेत. लोणावळ्यात 10 जण जोरदार पाण्याच्या प्रवाहात वाहुन गेले होते. त्यापैकी 5 जणांना पाण्याच्या प्रवाहातून बाहेर […]
अधिक वाचा...धक्कादायक Video: लोणावळा येथील भुशी डॅमवर कुटुंब गेलं वाहून…
पुणे : पुणे शहरातील अन्सारी कुटुंब वर्षाविहारासाठी लोणावळ्यातील भुशी डॅमवर आले होते. भुशी धरण परिसरात असलेल्या रेल्वे वॉटर फॉलवर पर्यटनाचा आनंद घेताना त्यांचा तोल जाऊन ते धबधब्यात पडले. सर्वांनी एकमेकांना आधार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याच्या शक्तीसमोर त्यांचा टीकाव लागू शकला नाही. आणि एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले. त्यातील तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश […]
अधिक वाचा...बापरे! पाण्याच्या सीलबंद बाटलीत आढळली मेलेली पाल…
रांची (झारखंड) : झारखंडमधील टाटानगर रेल्वे स्टेशन पार्किंग परिसरात एका व्यक्तीने पाणी विकत घेतल्यानंतर सीलबंद बाटलीमध्ये मेलेली पाल आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. सिल्की ड्रॉप या कंपनीच्या विक्रीसाठी आणलेल्या बाटलीमध्ये ही पाल आढळून आली आहे. टाटानगर मंडळ काँग्रेसचे अध्यक्ष मुन्ना मिश्रा आणि बाटली विकत घेणारे अरुण सिंग यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. दुकानदार मोना […]
अधिक वाचा...भंडारदरा धरणात बुडून युवकाचा मृत्यू…
अकोले (अहमदनगर) : भंडारदरा धरणात पोहण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज (शनिवार) दुपारी घडली आहे. सद्दाम शेख (वय 26, रा. पूनमनगर, शिर्डी) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. भंडारदरा परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक गर्दी करत असतात. शिर्डी परिसरातील सहा युवक भंडारदरा येथे पर्यटनासाठी आले होते. त्यातील काही जण भंडारदरा धरणाच्या […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यात चार मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): पुणे जिल्ह्यातील निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील एका शेततळ्यामध्ये शुक्रवारी (ता. २४) दुपारच्या सुमारास चार मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राधिका नितीन केदारी (वय 14, राहणार कानेवाडी ता. खेड), श्रद्धा काळू नवले (वय वर्ष 13), सायली काळू नवले (वय 11वर्ष), […]
अधिक वाचा...उजनी धरणात बोट उलटल्याने पाच जण बुडाले…
सोलापूर: उजनी धरणात प्रवासी वाहतूक करणारी बोट उलटल्याने पाच जण बुडाले असून, त्यामध्ये दोन बालकांचा समावेश आहे. धरणात बुडालेल्या सहा जणांचा शोध घेण्याकरिता रात्रभर शोधकार्य सुरू राहिले. सलग दुसऱ्या दिवशी आज शोधकार्य सुरू आहे. बोटीत राहुल डोंगरे हे पोलिस उपनिरीक्षक होते. त्यांनी बोट उलटल्यानंतर धाडसाने पोहत धरणाचा काठ गाठून जीव वाचवला. बोटमधील वाचलेल्या तरुण पोलिस […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! एकमेकांना मिठी मारल्याने चौघांचा बुडून मृत्यू…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बस्तवडेत वेदगंगा नदीवर असणाऱ्या बंधाऱ्यात बुडून चौघांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्याला वाचवण्याच्या नादात एकमेकांना मिठी मारल्याने हा भयंकर प्रकार घडला आहे. जितेंद्र विलास लोकरे (वय 36, रा. मुरगूड ता. कागल) रेश्मा दिलीप येळमल्ले […]
अधिक वाचा...
