मोठी दुर्घटना! नेपाळमध्ये प्रवाशांनी भरलेल्या दोन बस नदीत कोसळल्या…
काठमांडू (नेपाळ) : नेपाळमध्ये दरड कोसळली आणि प्रवाशांनी भरलेल्या दोन बस नदीत कोसळल्या आहेत. याची माहिती मिळताच अधिकारी आणि बचावकार्यासाठी जवान पोहोचले आहेत.
त्रिशूली नदीत दोन बस वाहून गेल्या. या दोन बसमध्ये प्रवास करणारे 63 जण बेपत्ता आहेत. मृतांमध्ये 7 भारतीयांचा समावेश आहे. सध्या रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली असून शोधकार्य आणि बचावकार्य सुरू आहे. कर्मचाऱ्यांनी भूस्खलनाचा ढिगारा हटवण्यास सुरुवात केली. मात्र बदलत्या वातावरणामुळे अडथळे येत आहेत.
अपघातात सापडलेली एक बस बीरगंजहून काठमांडूला जात होती तर दुसरी बस गौरहून काठमांडूला जात होती. नारायणघाट-मुगलिंग मार्गावर दरड कोसळल्याने हा अपघात झाला. आज (शुक्रवार) पहाटे साडेतीन वाजता नारायणघाट ते मुगलिंग दरम्यान ही घटना घडली. या अपघातात अनेकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे.
चितवनचे मुख्य जिल्हा अधिकारी इंद्रदेव यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही बसमध्ये बस चालकांसह एकूण 63 जण प्रवास करत होते. पहाटे साडेतीनच्या सुमारास दरड कोसळल्याने बसेस त्रिशूल नदीत वाहून गेल्या. आम्ही घटनास्थळी आहोत आणि शोध मोहीम सुरू आहे. सततच्या पावसामुळे बेपत्ता बसेसचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत.
नेपाळमध्ये भीषण अपघात 6 भारतीय भाविकांसह 7 जणांचा मृत्यू…
नेपाळमधील विनाशकारी भूकंपात अनेकांचा बळी…
दिल्ली ते नेपाळपर्यंत चोरी करून कमावली कोट्यावधी रुपयांची संपत्ती…
वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना भीषण अपघात, दोन मुलींसह जावयाचा मृत्यू…
भीषण अपघात! दुधाच्या कंटेनर आणि बसमध्ये धडक; 18 जणांचा जागीच मृत्यू…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…