
बापरे! पाण्याच्या सीलबंद बाटलीत आढळली मेलेली पाल…
रांची (झारखंड) : झारखंडमधील टाटानगर रेल्वे स्टेशन पार्किंग परिसरात एका व्यक्तीने पाणी विकत घेतल्यानंतर सीलबंद बाटलीमध्ये मेलेली पाल आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. सिल्की ड्रॉप या कंपनीच्या विक्रीसाठी आणलेल्या बाटलीमध्ये ही पाल आढळून आली आहे.
टाटानगर मंडळ काँग्रेसचे अध्यक्ष मुन्ना मिश्रा आणि बाटली विकत घेणारे अरुण सिंग यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. दुकानदार मोना साहू यांची चौकशी केल्यानंतर दोघांनी पाणी वितरकाला बोलावून विचारणा केली. याबाबत जिल्हा अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’
मुन्ना मिश्रा आणि अरुण सिंग त्यांच्या मित्रांसोबत बसले असताना तहान लागल्यानंतर त्यांनी टाटानगर स्टेशन पार्किंगजवळील मोना साहूच्या दुकानातून पाण्याची बाटली घेतली. मुन्ना बाटली उघडणार असतानाच अरुण यांनी नजर बाटलीतील मेलेल्या पालीवर गेली. त्यामुळे त्यांनी पाण्याच्या बाटलीचे सील न तोडता बाटलीवर लिहिलेल्या क्रमांकावर फोन केला. बाटलीमध्ये पाल आढळल्याचे समजताच दुकानदाराने दुकान बंद करून पळ काढला.
बागबेडा परिसरातील सिल्की ड्रॉप कंपनीच्या पाण्याचे वितरण करणारे घटनास्थळी पोहोचले. वितरकाने हे प्रकरण संपवण्याची विनंती करण्यास सुरुवात केली, परंतु दोघेही मान्य झाले नाहीत. येथे, वितरकाने मुन्ना मिश्राला सांगितले की, जमशेदपूरमधील सिल्की ड्रॉप पाण्याची बाटली महामार्गावरील भिलाईपहारी प्लांट आणि पश्चिम बंगालमधील बलरामपूर प्लांटमधून येते. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडे पाण्याची विभागीय चाचणी करण्याची मागणी करणार असल्याचे मुन्ना मिश्रा यांनी सांगितले.
आईस्क्रिममध्ये सापडलेल्या बोटाबाबत पोलिसांकडून मोठा खुलासा…
Video: आईस्क्रीममध्ये बोटानंतर सापडली गोम…
मुंबईत आईस्क्रिममध्ये सापडलेल्या बोटाचे पुणे कनेक्शन; कंपनी म्हणाली…
मुंबईत महिलेला आईस्क्रीम खाताना कोनमध्ये सापडलं माणसाचं बोट…
संतापजनक Video: आईस्क्रीमवाला हस्तमैथुन करून ग्लासमध्ये टाकत होता वीर्य…
नवऱ्यासोबत मैत्रिणीला रंगेहात पकडल्यावर मैत्रिणीला गेटला बांधले अन्…
हृदयद्रावक! एक तासापूर्वी माहेरी आलेल्या नवविवाहितेचा वीज पडून मृत्यू…
डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीची आत्महत्या…
क्लास वन अधिकारी असलेल्या सुनेने संपत्तीसाठी काढला सासऱ्याचा काटा…
मुंबई विमानतळावर महिलांची सोन्याची तस्करी करण्याची पद्धत पाहून अधिकारी चक्रावले…

