हृदयद्रावक! गरम पाण्याचे पातेले अंगावर उलटल्याने चिमुकलीचा मृत्यू…
छत्रपती संभाजीनगर : आईने गॅसवर ठेवलेले गरम पाण्याचे पातेले अंगावर उलटल्याने अवघ्या पंधरा महिन्यांची चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शहरातील उस्मानपुरा भागात घडली आहे. नुरेन अजिम सय्यद असे मृत चिमुकलीचे नाव आहे. अजिम सय्यद हे शहरातील उस्मानपुरा भागात राहात असून, त्यांना 15 महिन्याची नुरेन नावाची मुलगी होती. नुरेनाच्या वडिलांसाठी आईने गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवले […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! दिवाळीच्या सुट्टीत मामाच्या गावाला आल्या अन्…
यवतमाळ : दिवाळीच्या सुट्टीनिमित्त दोन मुली मामाच्या गावाला आल्या होत्या. परिसरात खेळत असतानाच तलावात पडल्या आणि दोघींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मनदेव गावा येथील जेतवनमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रिया किशोर बिहाडे आणि काव्या धम्मपाल भगत अशी मृत्युमुखी पडलेल्या दोन मुलींची नावे आहेत. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! दसऱ्याच्या सणाचे धुणे धुण्यास गेलेल्या बाप-लेकाचा बुडून मृत्यू…
सांगली : दसऱ्याच्या सणाचे धुणे धुण्यास गेलेल्या बाप-लेकाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बंडगरवाडीत (ता. कवठेमहांकाळ) येथे घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. तलावात दसऱ्याच्या सणाचे धुणे धुण्यास बाप-लेक गेले होते. तलावामध्ये पाय घसरून पडल्यामुळे राजेंद्र अण्णाप्पा चव्हाण (वय 48) व त्यांचा मुलगा कार्तिक राजेंद्र चव्हाण (18, रा. दोघेही करोली टी, […]
अधिक वाचा...दीड दिवसांच्या गणपती विसर्जन करताना तिघांचा बुडून मृत्यू…
पालघर: दीड दिवसांच्या गणपती विसर्जन करताना तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. जगत नारायण मौर्य (वय 38), सुरज नंदलाल प्रजापती (वय 25), प्रकाश नारायण ठाकरे (वय 35) अशी तलावात बुडून मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. बुधवारी सायंकाळी दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यासाठी गेले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने कोनसई येथील […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यातील भाटघर धरणात बुडून वडील आणि मुलीचा मृत्यू…
पुणे : पुणे जिल्ह्यातील भाटघर धरणात वडील आणि मुलगी बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून वडील अद्याप बेपत्ता आहेत. ऐश्वर्या धर्माधिकारी (वय 13) आणि शिरीष धर्माधिकारी (वय 45, रा. बालेवाडी) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. बालेवाडी येथे राहणारे फालक आणि धर्माधिकारी कुटुंब 15 ऑगस्ट रोजी भोर तालुक्यातील जयतपाड गावातील मुंगळे […]
अधिक वाचा...पुणे शहरातील आयटी अभियंत्याचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू…
पुणे : मित्रांसोबत फिरायला गेलेल्या आयटी अभियंत्याचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज (मंगळवार) दुपारी साडेबाराच्या सुमारास रिहे (मुळशी) गावच्या हद्दीत घडली आहे. हर्षित पोटलुरी (वय 27, मुळ रा. राजमुन्ड्री, आंध्र प्रदेश) असे मृत्युमुखी पडलेल्या आयटी अभियंत्याचे नाव आहे. हर्षित हा काही महिन्यांपासून हिंजवडी येथे राहत होता. तो हिंजवडी आयटी पार्क फेज तीन मधील एका […]
अधिक वाचा...जम्मू-काश्मीरमध्ये नदी ओलांडताना दोन जवान गेले वाहून…
श्रीनगरः जम्मू-काश्मीरमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. पुंछमध्ये नदीचा प्रवाह ओलांडताना भारतीय लष्कराचे दोन जवान वाहून गेले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन जवान शनिवारी पुंछ परिसरात गस्त घालत होते. नदी ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना जोरदार प्रवाहाच्या तडाख्यात आल्याने दोन जवान वाहून गेले आहेत. पुंछ जिल्ह्यातील मुगल रोडलगत पोशाना भागात बचाव आणि […]
अधिक वाचा...
