प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन हिने घेतली पोलिसांत धाव; कारण…

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन हिच्या नावानं एक फेक इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करुन त्या अकाऊंटवरुन पैसे मागण्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार लक्षात येताच विद्या बालन हिने मुंबई पोलिसांत धाव एका अज्ञाताविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

अभिनेत्री विद्या बालन ही सोशल मीडियावर सक्रीय असते. पण याच सोशल मीडियाचा विद्या बालन हिला मोठा धक्का बसला आहे. विद्या बालन हिच्या नावाने एक फेक इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करुन त्या अकाऊंटवरुन पैसे मागण्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार लक्षात येताच विद्या बालन हिने मुंबई पोलिसांत धाव घेत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘विद्या बालन हिने एका अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्या व्यक्तीने विद्या बालनच्या नावाचे फेक इन्स्टाग्राम ID आणि Gmail अकाऊंट तयार केले आहे. या अकाऊंटवरुन त्याने बॉलिवूडमधील अनेक कलाकारांशी संपर्क साधवण्याचा प्रयत्न केला आहे. कामाचे आश्वासन देऊन त्याने अनेकांनी पैशांची मागणी केली आहे. हा संपूर्ण प्रकार अभिनेत्री विद्या बालन हिच्या लक्षात येताच तिनं मुंबई पोलिसांच्या खास पोलिस स्टेशनमध्ये ITकलम 66(C) अंतर्गत FIR दाखल केली असून या प्रकरणी तपास सुरू आहे.’

विद्या बालन हिने सांगितले की, ‘एका जवळच्या माणसाकडून हा प्रकार समजला. अज्ञात व्यक्ती तिच्या फेक अकाऊंटवरुन अनेकांना मेसेज करुन त्यांच्याशी संवाद साधत आहे. व्हॉट्सअँप मेसेज करुन त्यांना कामाचे आश्वासन देऊन त्यांच्याकडे पैशांची मागणी करत आहे.’

‘देवमाणूस’ फेम अभिनेत्याच्या भावाने केली आत्महत्या…

पुणे शहरात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, अभिनेत्रीसह दोन मॉडेल…

अभिनेत्री जया प्रदा यांच्या अटकेसाठी पोलिसांचे छापे…

ज्येष्ठ अभिनेते ज्युनिअर मेहमूद यांचे निधन; शेवटची इच्छा…

अभिनेत्रीचा आढळला मृतदेह; प्रेमसंबंधातून आत्महत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!