
हृदयद्रावक! पती-पत्नीने एकाच झाडाला एकाच दोरीने घेतला गळफास…
जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील शिवापूर येथे एका दाम्पत्याने आपल्या शेतात एकाच झाडाला एकाच दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. भगवान पोपट जाधव (वय ३८) आणि आशाबाई भगवान जाधव (वय २७) असे आत्महत्या करणाऱ्या पती-पत्नीचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.
मृत जाधव दाम्पत्य हे शिवापूर शिवारातील आपल्या शेतातच वास्तव्यास होते. भगवान जाधव हे शेतीसोबतच मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शुक्रवारी मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास या दोघांनी घरापासून काही अंतरावर असलेल्या उंबराच्या झाडाला एकाच दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. सकाळी नेहमीप्रमाणे नातेवाईक शेतात गेले असता, त्यांना झाडाला लटकलेल्या अवस्थेत हे दाम्पत्य आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. नातेवाइकांनी तातडीने दोघांना खाली उतरवून चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले.
मृत भगवान आणि आशाबाई यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन लहान मुलं आहेत. ही दोन्ही मुले शिक्षणासाठी सध्या बाहेरगावी राहत असल्याने या भीषण घटनेवेळी ती घरी नव्हती. दोन्ही चिमुकली आता पोरकी झाली असून, त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जाधव दांपत्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. घरगुती वाद, आर्थिक विवंचना की अन्य काही कारण, याचा शोध पोलिस घेत आहेत. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करत आहे.
हृदयद्रावक! चिमुकल्याला पाठीवर घेऊन आई धावत सुटली पण नको ते घडलं…
हृदयद्रावक! डॉ. स्तुती सोनवणे यांनी लिहिलेली सुसाईड नोटमध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख…
हृदयद्रावक! वाढदिवसच ठरला आयुष्यातला शेवटचा दिवस; यंत्रात स्कार्फ अडकला अन् गेला जीव…
हृदयद्रावक! एक नवविवाहित तर दुसऱ्या बहिणाचा विवाहापूर्वी अपघाती मृत्यू…
हृदयद्रावक! साताऱ्यात थरकाप उडवणारा अपघात; शिक्षिकेचा जागीच मृत्यू…

